Vivek Lagoo Passes Away: दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती विवेक लागू यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार

  102

Vivek Lagoo Passes Away: ज्येष्ठ नाट्य अभिनेते विवेक लागू यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे ते माजी पती होते.  वृत्तानुसार, विवेक लागू यांनी (१९ जून २०२५) रोजी अखेरचा श्वास घेतला. विवेक लागू हे मराठी नाट्य जगतातील एक आदरणीय व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतही आपले योगदान दिले. त्यांची माजी पत्नी रीमा लागू यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात त्यांची चांगली कारकीर्द होती.


अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटांमध्ये विवेक लागू यांनी काम केलं आहे. 'व्हॉट अबाऊट सावरकर', 'अग्ली', '31 दिवस' या चित्रपटांममध्ये त्यांनी काम केलं असून, 'चार दिवस सासूचे' , 'हे मन बावरे' या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.


रीमा लागू यांचे माजी पती



१९७६ मध्ये बँकेत काम करत असताना रीमा लागू आणि विवेक लागू या दोघांची पहिली भेट झाली, रंगभूमीवरील त्यांच्या प्रेमामुळे ते एकत्र आले. १९७८ मध्ये त्यांचे लग्न झाले. पण काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही विवेक आणि रीमा एकमेकांबद्दल आदर राखत होते.  विवेक आणि रीमा यांना मृण्मयी लागू वैकुल ही मुलगी आहे. मृण्मयीने कुटुंबाचा कलात्मक वारसा पुढे नेला आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून तिने थप्पड आणि स्कूप सारख्या उत्तम चित्रपटांसाठी काम केले आहे.


अंतिम संस्कार कुठे केले जातील?


 विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव होतं. विवेकच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम विकी लालवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली. विवेक लागू यांचे अंत्यसंस्कार आज, (शुक्रवार, 20 जून 2025) ओशिवरा स्मशानभूमीत केले जातील.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमाचा टीझर रिलीज, दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट

मुंबई : ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आगामी 'दशावतार'

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी