IND vs ENG : यशस्वी-शुभमनची शतके, लीड्स कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनला लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर आजपासून सुरू झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसअखेर भारताने ३ बाद ३५९ धावा केल्या आहेत. शुभमन गिल १२७ आणि ऋषभ पंत ६५ धावांवर नाबाद आहेत. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी १९८ बॉलवर १३८ धावांची भागीदारी केली आहे.


पहिल्या डावात भारतीय संघाची सुरूवात शानदार राहिली. केएल राहुल आणि यशस्वी जायसवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर या भागीदारीचा अंत झाला. राहुलला ब्रायडन कार्सने बाद केले. त्याने ७८ बॉलमध्ये ४१ धावा केल्या. यात ८ चौकारांचा समावेश होता.


लंचनंतर यशस्वी जायसवाल आणि शुभमन गिलने डाव पुढे नेला. दोघांमध्ये शतकी भागीदारी झालली. या भागीदारीदरम्यान यशस्वीने ८ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.


शुभमनने कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या डावात ५० आणि त्यापेक्षा अधिक धावा करणारा नववा भारतीय आहे. सोबतच शुभमन सगळ्यात कमी वयाचा भारतीय कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून एका डावात ५० आणि त्याहून अधिक धावा केल्या आहेत.


यशस्वी जायसवालने १४४ बॉलमध्ये शतक पूर्ण केले. यशस्वीने कसोटी करिअरमधील ५वे शतक ठरले. दरम्यान, शतकानंतर यशस्वी अधिक काळ क्रीझवर टिकू शकला नाही. बेन स्टोक्सने त्याला बाद केले. यशस्वीने १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५९ बॉलमध्ये १०१ धावा केल्या. यशस्वी आणि शुभमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली.


यशस्वी बाद झाल्यानंतर शुभमन गिलने ऋषभ पंतसोबत डाव पुढे नेला. दोघांनी शतकी भागीदारी करत भारताला चांगल्या स्थितीत आले. गिलने १४० बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. यात त्याने १४ चौकार ठोकले. तर पंतने ९१ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या