शास्ती माफी लवकरात लवकर लागू करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी


पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शास्ती माफीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली असता शास्ती माफी लवकरात लवकर लागू करावी, जास्तीत जास्त शास्ती माफी देण्यात यावी आणि त्याचबरोबर पूर्वीच्या काळात ज्या


मालमत्ताधारकांनी शास्ती भरली आहे त्यांनाही पुढे भरायच्या करामधून आधी भरलेल्या शास्तीची रक्कम वगळण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. या संदर्भामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये नागरिकांनी भरलेली शास्ती पुढील टॅक्स भरणातून वगळण्यात आल्याची प्रकरणे असल्याबाबत माहिती दिली व त्याचा अभ्यास करून याबाबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली.


या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली आहे.

Comments
Add Comment

आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

खालापूर : थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर

जिल्ह्यात ८ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी

यंदा १२ हजार ६३४.३५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, भाजीपाला लागवड अलिबाग : भाताचे कोठार म्हणून रायगडाची ओळख पुसली

परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा कौल

डॉक्टर, वकील शिक्षित उमेदवारांना मतदारांनी नाकारले ! राहुल देशमुख कर्जत : नगराध्यक्षपदासाठी परिवर्तन विकास

नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून उड्डाणे

नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

अलिबागमध्ये शेकापला रोखण्यात भाजप, शिवसेना अपयशी

उबाठाचे दोन शिलेदार विजयी, भाजपाला एकच जागा सुभाष म्हात्रे अलिबाग : अलिबाग नगर परिषदेत महाविकास आघाडीतील

रोहा नगर परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी

रोहा : स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये २ डिसेंबर रोजी रोहा नगर परिषदेच्या हद्दीत मतदान घेण्यात आले. त्याची