इंग्लिश खाडी पार करून ठाण्याच्या मानव मोरेने रचला इतिहास

ठाणे : पाचपाखाडी परिसरात राहणारा मानव मोरे या तरुण जलतरणपटूने आपल्या अपार मेहनतीने, अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश खाडी पार करून भारताच्या क्रीडाक्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे. समुद्राचं तापमान थंड, लाटा अनियमित आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करत करत मानवने १३ तास ३७ मिनिटं अखंड पोहत ही खाडी पार केली. मानवने त्याचे जलतरणाचे प्रशिक्षण ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे घेतले आहे.


अगदी लहानपणापासून पाण्याशी असलेली जवळीक आणि त्याच्यातली प्रचंड मेहनतीची तयारी त्याला या स्तरावर घेऊन गेली आहे. पण हे यश फक्त माझेच नाही तर त्याच्यासाठी परिश्रम घेणारे त्याचे मार्गदर्शक, प्रशिक्षक कैलास आखाडे सर आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे त्याचे पालक यांचाही तितकाच मोलाचा वाटा असे त्याने सांगितले. त्याचं हे यश अनेक नवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारं आहे, असे त्याचे प्रशिक्षक म्हणाले.

Comments
Add Comment

मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक

युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि

ठाण्यात घराणेशाहीचा वाद चिघळला

खा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

कडोंमपा निवडणुकीसाठी महायुतीत धुसफूस

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडकीस

अवयवदानातून मिळाले ६ रुग्णांना जीवदान

ठाणे : ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे.

बदलापूरमध्ये बिबट्याची दहशत ;लोकवस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

ठाणे : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्या वनक्षेत्र सोडून वारंवार मानवीवस्तीत प्रवेश करत आहे.

पडताळणीअंती नवी मुंबईत १३ हजार ३३६ दुबार मतदार

एका ठिकाणी मतदान करण्याबाबत भरून घेतले हमीपत्र नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई