Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहते.

योगामुळे शरीर निरोगी आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदतो. दरम्यान, योगा करण्याआधी आणि केल्यानंतर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याचे आपल्या शरीरास फायदेच होतात.

आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत जे योगाच्या आधी आणि नंतर खाल्ले पाहिजेत. यासोबत हे ही जाणून घेऊया की योगाच्या किती वेळाआधी आणि नंतर खाल्ले पाहिजे.

योगाच्या किती वेळ आधी खावे


कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी आणि योग्य प्रकारे योगा करायचा असेल कर कमीत कमी ४५ मिनिटे आधी खाल्ले पाहिजे. संपूर्ण जेवण घेण्याऐवजी हलका नाश्ता घ्या. यामुळे शरीरास एनर्जी मिळेल. तुम्ही मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी अगदी सहज प्रोटीन बार अथवा प्रोटीन शेक पिऊ शकता.

काय खाल?


मूठभर नट्स, ताजी फळे, स्मूदी, नारळपाणी, लिंबू पाणी, दही, ज्यूस, अंडी तसेच एक वाटी सलाडही तुम्ही योगाच्या आधी खाऊ शकता.

किती वेळ खाऊ नये?


योगा आणि जेवण यांच्यात कमीत कमी ३० ते ४० मिनिटांचे अंतर असले पाहिजे. म्हणजेच योगा केल्यानंतर कमीत कमी ३० ते ४० मिनिटांपर्यंत काही खाऊ नये. योगानंतर तुम्हाला एनर्जेटिक राहण्यासाठी प्रोटीन, कार्ब्स, आणि इतर पोषकतत्वांनी भरपूर पदार्थ खाल्ले पाहिजेत.

जर तुम्ही सकाळी लवकर योगा करत असाल तर तुम्ही नाश्त्यात पोहे, सँडविच, फळांसोबत दलिया, उकडलेली अंडी, फळे तसेच भाज्या यांचे सेवन केले पाहिजे.

जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर क्विनोआ उपमा, चिला, व्हेजिटेबल शेवया, सूप, पनीर भुर्जी, खिचडी आणि चिकनसोबत फ्राय भाज्या यासारखा पौष्टिक आहार घेऊ शकता.

 
Comments
Add Comment

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या' ८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा