पावसाळी पर्यटनावर वन विभागाचा लगाम

  40

राष्ट्रीय उद्यान परिसरात बंदी; धबधब्यांवर गेल्यास होणार कठोर कारवाई


ठाणे : पावसाळा सुरू होताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसर हिरवाईने नटलेल्या जंगलातील सौंदर्य पर्यटकांना खुणावत. अनेक जण येथे भटकंती, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग, ‘ट्रेकिंग’ किंवा ‘रिल्स’ बनवण्यासाठी गर्दी करू लागतात. विशेषतः पावसामुळे जिवंत झालेल्या झऱ्यांमुळे निर्माण होणारे धबधबे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात्र याच धबधब्यांचा आनंद काही वेळा जीवघेणा ठरू शकतो याच पार्श्वभूमीवर वन विभागाने अशा जागेत जाण्यासाठी प्रतिबंध केला आहे. मागील काही वर्षांत धबधब्याजवळ घडलेल्या अपघाती घटनांमध्ये काही तरुणांचे बळी गेले आहेत.


अचानक वाढलेला पाण्याचा प्रवाह, निसरडी दगडमाती, अंदाज न येणारे खोलगट भाग, आणि सेल्फी घेण्याच्या नादात मृत्यूच्या दाढेत ओढले आहे. या साऱ्यामुळे ही ठिकाणं धोकादायक ठरत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, ठाणे वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी पावसाळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत.



अनधिकृत प्रवेशमार्गांवर विशेष लक्ष


धबधब्याजवळ जाणे, उशिरा पर्यंत थांबणे, मद्यप्राशन करून जंगल परिसरात फिरणे किंवा मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी अतिक्रमण करणे, या साऱ्यांवर आता बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. वन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे, जंगलात गस्त घालणारे पथक, तसेच स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने योजना आखली आहे. जंगलात कोणतेही अनधिकृत प्रवेशमार्ग वापरले जात असल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
- मयुर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक