अवैध धंद्यांवर गार्‍हाणी कारवाईचा इशारा!

प्रभारी अधिकाऱ्यांना SP घार्गेंचा सज्जड दम; दुर्लक्ष केल्यास शिस्तभंग अटळ


नगर - जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे खपवले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यात यावे, अन्यथा संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी बजावले.


जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा व वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा आढावा घेतल्यानंतर घार्गे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना कठोर आदेश दिले. त्यांनी सांगितले की, गुटखा, सुगंधी तंबाखू, गोमांस, अवैध दारू, गांजा, ड्रग्ज विक्री, अनैतिक मानवी तस्करी, वाहन चोरी, अवैध वाळू व गौण खनिज उपसा, ऑनलाईन जुगार, अवैध शस्त्रसाठा आणि पेट्रोलियम पदार्थांची तस्करी अशा सर्व अवैध धंद्यांवर आक्रमकपणे कारवाई झाली पाहिजे.



विशेष पथकाची धडक कारवाई


या कारवायांसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक नेमले असून ते सातत्याने छापे टाकून कारवाई करणार आहे. कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं शक्य नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.


प्रत्येक पोलिस ठाण्याने आपल्या हद्दीतील कारवायांचा मासिक अहवाल सादर करावा, त्याचा थेट आढावा आपण घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई