Stock Market Update: बाजाराचा पडझड सुरूच VIX २.४३%, सेन्सेक्स ८७.९३ व निफ्टी २२.०० अंकाने घसरला!

  52

प्रतिनिधी: सकाळी बाजार उघडल्यावरच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळी गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) ०.१३% घसरल्यानंतर बाजारात पडझडीचे संदेश मिळाले होते. याशिवाय युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात न करता 'जैसे थे' ठेवल्यानंतर बाजारात अपेक्षित अर्ली ट्रेंड रॅली मिळू शकली नाही.किंबहुना आज आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाबरोबरच कामगिरीवर आधारित समभाग (Shares) हालचाली राहू शकतात हे तज्ञांनी का लच म्हटले होते. त्याचीच पुनरावृत्ती होत सकाळच्या सत्रातील सुरूवातीच्या कलात घसरण झाली आहे. सेन्सेक्स (Sensex)८७.९३ अंकांने घसरत ८१३५८.०२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी (Nifty 50) २२.०० अंकाने घसरत २४७९० .०५ पातळीवर पोहोचला आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांकात ७.७९ अंकांने घसरण झाली आहे तर बँक निफ्टी (Bank Nifty) मध्ये ११८.३५ अंकाने घसरण झाली आहे. कालप्रमाणेच अर्ली ट्रेंडमध्ये मिडकॅप (Midcap) व स्मॉलकॅप (Small Ca p) यामध्ये अनुक्रमे ०.०८% व ०.१८% वाढ झाली आहे तर निफ्टी मिडकॅपमध्ये ०.०५% वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.१२% वाढ झाली.


आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) कंज्युमर ड्युरेबल्स (०.५९%), रियल्टी (०.२४%), मिडिया (०.२४%), खाजगी बँक (०.१३%) समभागात वाढ झाली आहे तर आयटी (०.६७%), मेटल (०.४१%), हेल्थकेअर (०.१४%), मिड स्मॉलकॅप आयटी व टेलिकॉम (०.५१%) समभागात घसरण झाली.


आज इंडिया वीआयएक्स (VIX) निर्देशांकात २.४३% घसरण झाल्याने बाजारात दबाव निर्माण झाला आहे आज अखेरच्या सत्रात काय बदल होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र फायनाशिंयल सर्विसेस, बँक समभागांच्या हालचालीवर लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. कंज्युमर ड्युरेबल्स चांगल्या स्थितीत असल्याने त्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असू शकते. मात्र अमेरिकन बाजारात फेड रेट कट न झाल्याने, मध्यपूर्वेतील दबाव, व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ होत अस ल्याने बाजार त्याला कसा प्रतिसाद देईल ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः मिडकॅप शेअर्समधील हालचाल वीआयएक्सवर प्रभावित ठरू शकते असा कयास आहे.


आज बाजारात सर्वाधिक वाढ असाही इंडिया ग्लास (Asahi India Glas) (४.७३%), ज्यूबलिएंट (३.३८%),३६० वन (२.४५%), कोरोमंडल इंटरनॅशनल (२.०१%), हिताची एनर्जी (२.५८%), डेटा पॅटर्न (२.२६%), सफायर फूड (२.०१%), किर्लोस्कर ब्रदर्स (१.८५%), युनायटेड स्पिरीट (१.१४%), मॅक्रोटेक डेव्हलपर (१.०३%), आयशर मोटर्स (०.९१%), एलआयसी (०.८९%), टायटन कंपनी (०.८१%), सीजी पॉवर (०.८०%), टीव्हीएस मोटर्स (०.७३%) या समभागात घसरण वाढ झाली आहे.


तर सीएंट (Cyient ३.३५%), वरूण बेवरेजेस (२.०३%), केपीआयटी टेक्नॉलॉजी (१.६७%), वेदांता (१.६१%), इक्लर्क सर्विसेस (१.४९%), टाटा कम्युनिकेशन (१.३७%), अदानी पोर्टस (१.३६%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.३५%), एनटीपीसी (१.३४%), टेक महिंद्रा (१.३१%), बँक ऑफ इंडिया (१.१३%), इक्विटाज स्मॉलफायनान्स (२.४८%), वरुण बेवरेजेस (१.८७%), टेक महिंद्रा (१.६४%), अदानी पोर्टस (१.५२%), अदानी एनर्जी सोल्यूशन (०.९०%), होडांई मोटर्स इंडिया (०.८९%), इन्फोसिस (०.८०%), झायडस लाईफसायन्स (०.७६%), इंडसइंड बँक (०.६८%) या समभागात अधिक घसरण झाली.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं