पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता, संंरक्षित भिंतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद...

मुंबई : मुंबईतील अनेक भागात झोपड्या उभ्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवर घडत असतात.  त्यात अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी संरक्षित जाळ्या आणि भिंती उभारण्याचा निर्णय घेतलाय... विशेष म्हणजे राज्य सरकारने दरडप्रवण क्षेत्र निश्चित करुन तेथे संरक्षण भिंती उभारण्याची जबाबदारी म्हाडाच्या (MHADA)  झोपडपट्टी सुधार मंडळ (Slum Improvement Board) आणि सार्वजनिक बांधकाम (Public works) विभागावर सोपविण्यात आली आहे.

काही झोपडपट्टी भागांमध्ये ९ मीटरच्या आतील भिंतीचे काम झोपडपट्टी सुधार मंडळ करणार आहे, तर ९ मीटरच्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी जिल्हा समितीकडून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या माहितीनुसार मुंबई शहरात एकून २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८० ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत १४ ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्याची कामे सुरु आहेत. राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी दरडप्रवण क्षेत्रात पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर कामे कशी पूर्ण केली जातील याचा आराखडा देखील तयार केला आहे. परंतू ज्या भागात कामे सुरु नाहीत त्या भागात जाळ्या बसविण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे कामाला सुरुवात...

पहिल्या १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम झोपडपट्टी सुधार मंडळाने हाती  घेतले आहे. अशी माहिती मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी दिली. गुरुनानक एरिया (एसबीएस मार्ग), जरीमरी साकीनाका (कुर्ला), हबीब नगर (अंधेरी), शांताराम तलाव (दिंडोशी), टाईम्स इंडिया इमारतीच्या मागे (कांदिवली), आदर्श चाळ (कांदिवली), उपाध्याय नगर (अंधेरी), रामगृह, श्रीराम मंदिर, श्री वैष्णव आश्रम (जोगेश्वरी), काकड इस्टेट सिद्धार्थ नगर (वरळी) आणि वाडी बंदर (डाॅकयार्ड) या १० ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे...

 

 

 

 
Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा