भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची कमाल, पहिल्या क्रमांकाच्या होउ यिफानला हरवले

नवी दिल्ली : लंडन येथे सुरू असलेल्या FIDE वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने कमाल केली. दिव्याने पहिल्या क्रमांकाच्या होउ यिफानला हरवले. या कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींनी दिव्याचे अभिनंदन केले. दिव्याने एक्स पोस्ट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले.



संयम आणि दृढनिश्चयाने दिव्याने होउ यिफानचा पराभव केला. या कामगिरीसाठी दिव्याचे अभिनंदन असे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे. तर पंतप्रधानांकडून सन्मानित होणे खूप सन्मानाचे आणि प्रेरणादायी असल्याचे दिव्याने तिच्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.

नागपूरच्या १९ वर्षीय दिव्याने रुक-व्हर्सेस-बिशपच्या तणावपूर्ण अंतिम सामन्यात ७४ चालींमध्ये विजय मिळवण्यासाठी तिची प्रबळ इच्छाशक्ती आणि रणनीतिक कौशल्य दाखवले. दिव्याची कामगिरी बुद्धिबळ जगतात चर्चेचा विषय झाली आहे.

दिव्याने हेक्सामाइंड बुद्धिबळ क्लबच्यावतीने खेळत FIDE वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या होउ यिफानला हरवले. दिव्याच्या कामगिरीमुळे अखेर ती ज्या संघाची सदस्य होती त्या संघाने ब्लिट्झमध्ये कांस्यपदक आणि रॅपिड स्वरूपात रौप्यपदक मिळवले. तिच्या वैयक्तिक पदकांमध्ये सांघिक रौप्य (रॅपिड), सांघिक कांस्य (ब्लिट्झ) आणि वैयक्तिक कांस्यपदक यांचा समावेश आहे. दिव्याने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली.
Comments
Add Comment

IND vs PAK: आशिया कपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

दुबई: आशिया कपमध्ये आज सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४