बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवून एक कोटींचा अपहार; कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

  65

नाशिक : खोटे दस्तऐवज तयार करून निविदा तयार करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जि. प. च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप रतन अहिरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेच्या (इवद) विभाग क्रमांक ३ च्या तत्कालीन कार्यकारी अभियंता आरोपी शैलजा नलावडे यांनी इतर इसमांच्या संगनमताने शासन निर्णय क्रमांक टीडीएस २०२४/६/प्र. क्र. १२०/पर्यटन-१ दि. ६ ऑगस्ट २०२४ हा बनावट तयार केला. त्याद्वारे एक कोटी रुपयांची पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवून हा बनावट शासननिर्णय बेकायदेशीरपणे शासकीय लेखा अहवाल नोंदविला.



खोटे दस्तऐवज तयार करून निविदा भरणाऱ्या इसमांना शासनाच्या एक कोटी रुपयांच्या निधीचा गैरलाभ व्हावा, या उद्देशाने इतर शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी रुपयांच्या निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार


दि. ४ डिसेंबर २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या इमारत व दळणवळण विभाग क्रमांक ३ च्या कार्यालयात घडला. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे व इतरांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.

Comments
Add Comment

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल