Ex Dividend News: मालामाल होण्याचा आणखी एक अंतिम दिवस! बजाज ऑटोसह १३ कंपन्यांकडून Ex- dividend ट्रेडचा आज शेवटचा दिवस

  53

बजाज ऑटोकडून २१० रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर

प्रतिनिधी: आजही गुंतवणूकदारांना कमावण्यासाठी संधी कायम आहे. आज बजाज ऑटो, टाटा पॉवर, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स सह १३ कंपन्या एक्स लाभांशांसह (Ex Dividend) ट्रेडिंग करणार आहे. आजचा दिवस एक्स लाभांश मिळवण्यासाठी शेवटचा दिवस असणार आहे. उद्यापासून खरेदी करणाऱ्या भागभांडवलधारकांना एक्स लाभांश मिळू शकणार नाही. कंपनीने लाभांश मिळवण्यासाठी आजच्या दिवशी समभाग खरेदीसाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे. जो आजपर्यंत समभाग (शेअर्स) खरेदी करेल त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

सध्या T+ 1 सेटलमेंट पद्धतीत झालेल्या व्यवहारानंतर दुसऱ्या दिवशी समभाग सेटल होतात. त्यामुळे आजपर्यंत जे खरेदी करतील त्यांचे शेअर्स उद्यापर्यंत सेटल होऊ शकतात. वरील कंपन्यांसह बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, टाटा पॉवर, टोरेंट अशा आणखी ७ कंपन्या आपल्या एक्स लाभांशासह आज ट्रेड करतील. या कंपन्यांनी आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश जाहीर केला होता. या सगळ्या कंपन्यांचे समभाग T+1 सेटलमेंट पद्धतीत २० जूनपर्यंत व्यवहार करणार आहेत.

कंपन्यांनी जाहीर केलेला लाभांशाची यादी -

१) बजाज ऑटो - २० जून २१० रूपये प्रति समभाग

२) बँक ऑफ इंडिया - २० जून ४.०५ रूपये प्रति समभाग

३) एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स - २० जून २.१० रूपये प्रति समभाग

४) ग्रीनलँम इंडस्ट्रीज - २० जून ०.४० रुपये प्रति समभाग

५) मवाना शुगर - २० जून २०२५ १.०० रूपये प्रति समभाग

६) पंजाब नॅशनल बँक - २० जून २०२५ २.९० रूपये प्रति समभाग

७) सॉलिटेयर मशीन - २० जून २.०० रूपये प्रति समभाग

८) रोसारी बायोटेक - २० जून ०.५० रुपये प्रति समभाग

९) सुप्रीम इंडस्ट्रीज - २० जून २४.०० रूपये प्रति समभाग

१०) स्वस्तिक इनव्हेसस्मार्ट - २० जून ०.६० रूपये प्रति समभाग

११) टाटा पॉवर - २० जून ०.६० रूपये प्रति समभाग

१२) ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल - २० जून ०.३० रूपये प्रति समभाग

१३) टोरेंट - २० जून ६.०० रूपये प्रति समभाग

सर्वाधिक समभाग बजाज ऑटोकडून !

कंपनी उद्या २१० रूपये एक्स लाभांशांसह बाजारात ट्रेड करणार आहे. कंपनीने तब्बल २१० रूपये प्रति समभाग लाभांश (Dividend) जाहीर केला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ८ ऑगस्टपर्यंत कंपनी आपल्या भाग भांडवलधारकां ना लाभांशाचा लाभ देणार आहे. दुपारपर्यंत बजाज ऑटोची शेअर्स किंमत ०.४४ टक्क्याने वाढत ८५०० रूपयांवर गेली होती.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे

मुंबई : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण