Girgoan Ganeshotsav 2025 : गिरगाव गणेशोत्सव मंडळाचा अष्टविनायक दर्शन सोहळा!

८ मंडळ १ पवित्र प्रवास!


गणेशोत्सवाच्या निमित्ताने गिरगावमध्ये अष्टविनायक दर्शनाची सुवर्णसंधी, आठ मंडळांचा संयुक्त उपक्रम


मुंबई : गिरगाव गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी गिरगावातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र घेऊन नवा इतिहास रचणार आहे. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा गणशोत्सव यंदाच्या वर्षी साजरा होणार आहे. समाजोपयोगी उपक्रमांसह पर्यावरणपूरक सजावट हे यावर्षीचं त्यांच ब्रीद आहे.





महाराष्ट्रातील अष्टविनायक यंदा ८ मंडळांमध्ये उभे करणार आहेत. याची धुरा डॉ. सुमित पाटील यांच्या हाती सोपवण्यात आलेली आहे. त्याबद्धल डॉ. सुमित पाटील यांनी गिरगावातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे आभार मानले आहेत. या उपक्रमाबद्धल डॉ. सुमित पाटील म्हणाले की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांना समाजाला एकत्र आणण्याची तसेच समाजाचे प्रबोधन करण्याची उत्तम संधी मिळते. मंडळांनी या संधीचा सकारात्मक लाभ घेतला पाहिजे. मंडळांच्या अभिनव उपक्रमांमुळे कलेला चालना मिळते, कलाकारांना प्रोत्साहन मिळते. अनेकजण या निमित्ताने एकत्र काम करतात, एकमेकांशी जोडले जातात. याच कारणामुळे या उपक्रमाला 'अष्टविनायक वारी' असे नाव दिले आहे.

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यासह पुणे घाट परिसराला रविवारी रेड अलर्ट

मुंबई : रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई

मुंबईत दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) मुंबई युनिटने वडाळा टीटी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म ८० दिवस राहणार बंद

मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत

राज्याला पावसाचा दणका; मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला येणार गती

मुंबई : लिंक रोडचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामाच्या अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात