कच्च्या दुधासह चेहऱ्यावर लावा या ६ गोष्टी, चमकेल तुमची त्वचा

मुंबई: त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी महागडी ब्युटी उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय करणे अधिक फायदेशीर आहे. यातील एक उपाय म्हणजे कच्चे दूध. यातील लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचा एक्सफोलिएट होते. तसेच नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते.

कच्चे दूध आणि हळद


हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात आणि कच्च्या दुधामुळे त्वचा साफ होण्यास मदत होते. या दोघांचा फेसपॅक चेहऱ्यावरील डाग दूर कऱण्यास मदत करते.

कच्चे दूध आणि बेसन


बेसनमुळे त्वचा टाईट होण्यास मदत मिळते. तसेच दुधामुळे त्वचा मॉश्चराईज होते. हे कॉम्बिनेशन मृत त्वचा हटवण्यासाठी तसेच त्वचा चमकदार बनवण्यासाठी मदत करतात.

कच्चे दूध आणि मध


मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. दूध आणि मध मिसळून लावल्याने त्वचा कोमल आणि हायड्रेट राहते.

कच्चे दूध आणि चंदन पावडर


चंदन पावडरमुळे थंडावा मिळतो. तसेच दूध त्वचेची आतून सफाई करते. हे पॅक उन्हाळ्याच्या दिवसात स्किनला टॅनिंगपासून तसेच रॅशेसपासून आराम देतात.

कच्चे दूध आणि लिंबू


लिंबूच्या रसामध्ये ब्लीचिंगचे गुण असतात यामुळे त्वचा गोरी आणि साफ बनते. दूध याची तीव्रता संतुलित करते आणि स्किनला नुकसान होण्यापासून बचाव होतो.

कच्चे दूध आणि कोरफड जेल


कोरफडीचे जेलमुळे त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते. दूध आणि कोरफडीचे जेल चेहऱ्याला स्मूद आणि सॉफ्ट बनवते.
Comments
Add Comment

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा

मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस