Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेला पाठणार

अहमदाबाद: एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त बोईंग ड्रीमलायनर विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या दिवशी सापडला.विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की त्यातून डेटा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो तपासासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


गेल्या १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. या घटनेत एकूण २७० जणांचा मृत्यू झाला. या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे २ भाग म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) - उष्णता आणि आगीमुळे खराब झाले.


देशात अशी कोणतीही प्रयोगशाळा नाही जिथे डेटा पुनर्प्राप्त करता येईल. या कारणास्तव, आता त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी सरकारी अधिकारी देखील त्यांच्यासोबत असतील.

Comments
Add Comment

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात