मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात तरुणीने केली आत्महत्या

मुंबई : साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत २१ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव संध्या पाठक असे आहे. पण संध्याने आत्महत्या केलेली नाही, तिच्या बाबतीत घातपात झाला असावा, असा संशय पाठक कुटुंबाने व्यक्त केला आहे.

संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स (अंकशास्त्र) विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. ती गुरुवार १९ जून २०२५ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली. पण महाविद्यालयाच्या सकाळच्या सत्राची लगबग सुरू असताना संध्याने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिने प्राण सोडले. घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाने पोलिसांना दिली. संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पण पाठक कुटुंबाने वेगळा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. महाविद्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जाणार असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

मंगळवारपासून डॉक्टरांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई :  मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य

‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’

पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार प्रस्तावित

दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास होणार सुसाट मुंबई : पूर्व मुक्तमार्ग म्हणजेच इस्टर्न फ्रीवेच्या विस्तार करण्याचा

महाराष्ट्र हेच भारताचे ‘स्टार्टअप कॅपिटल’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नावीन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या