इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या आणले, आर्मेनियाच्या रस्त्याने दिल्लीला पोहोचले

नवी दिल्ली: इराणमध्ये अडकलेले ११० भारतीय विद्यार्थी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. यातील अधिकतर विद्यार्थी हे जम्मू-काश्मीरचे आहेत. हे विद्यार्थी उमिया मेडिकल युनिर्व्हसिटीचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्मेनिया आणि दोहाच्या रस्त्याने दिल्लीसाठी उड्डाण केले होते. त्यांचे विमान ३ तास उशिराने पोहोचले.


इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध पाहता भारत सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित आणण्यासाठी ऑपरेशन सिंधूची सुरूवात केली. सरकारच्या या विशेष ऑपरेशन अंतर्गत १७ जूनला इराणच्या उत्तर भाहात अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. या विद्यार्थ्यांना भारतीच्या दूतावासाच्या देखरेखीखाली रस्ते मार्गाने इराण येथून आर्मेनियाची राजधानी येरेवान येथे पोहोचवण्यात आले. ते या रस्त्याने दिल्लीला आले.



स्पेशल विमानाने दिल्लीला पोहोचले विद्यार्थी


सर्व विद्यार्थी बुधवारी दुपारी २.५५ वाजताच्या स्पेशल फ्लाईटने भारताच्या दिशेने रवाना झाले आणि गुरूवार सकाळी दिल्लीला पोहोचले. भारत सरकारने या अभियानाला सहकार्य दिल्याबद्दल इराण आणि आर्मेनिया सरकारचे विशेष आभार मानले आहेत. यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सोपे आणि सुरक्षित होण्यास मदत झाली.



अनेक दिवसांपासून सुरू आहे युद्ध


इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने भयंकर रूप घेतले आहे. बुधवारी इस्त्रायलने दावा केला होता की त्यांच्या वायुसेनेने ५० फायटर एअरक्राफ्ट पाठवत इराणवर हल्ला केला.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत