TeamLease Edtech Survey: भारतातील वर्किंग प्रोफेशनल्स करिअर प्रगतीबाबत अधिक सजग

  35

स्वतःच्या खर्चावर नव्या स्किल्स शिकण्याकडे कल: टीमलीज एडटेक


मुंबई:भारतातील वर्किंग प्रोफेशनल्स आता त्यांच्या करिअर प्रगतीबाबत अधिक सजग झाले आहेत आणि नवे कौशल्य शिकण्याची (अपस्किलिंगची) जबाबदारी स्वतः स्वीकारत आहेत, असे टीमलीज एडटेकच्या नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. अपस्किलिंगचा परफॉर्मन्स अप्रेजलवर परिणाम” या अहवालानुसार, केवळ २३.९% नियोक्त्यांनी अपस्किलिंगसाठी पूर्ण प्रायोजन केले, तर तब्बल ४६% कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खर्चावर नव्या स्किल्स शिकण्याचा निर्णय घेतला. या अभ्या सात टेक्नोलॉजी, फायनान्स, सेल्स, ऑपरेशन्स आणि मानवसंसाधन क्षेत्रातील १४,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया समाविष्ट आहेत. त्यानुसार ८४% कर्मचाऱ्यांनी मागील वर्षात काही ना काही प्रकारचे अपस्किलिंग केले, जे दीर्घका लीन करिअर नियोजन आणि भविष्यातील तयारीसाठी केले गेले.


६४% पेक्षा अधिक जणांनी सांगितले की, अपस्किलिंगचा त्यांच्या अप्रेजलवर थेट सकारात्मक परिणाम झाला. विशेष म्हणजे ४२% जणांना अपस्किलिंग केल्यानंतर केवळ १८ महिन्यांत प्रमोशन, जबाबदारी वाढ किंवा पगारवाढ मिळाली. ४० % पेक्षा अधिक प्रतिसादकर्त्यांनी नमूद केले की त्यांनी अपस्किलिंग मुद्दाम अप्रेजल जवळच्या कालावधीत केले जेणेकरून त्याचा जास्त प्रभाव पडेल. ज्या व्यावसायिकांनी अपस्किलिंग केली, त्यांना अप्रेजलमध्ये, ज्यांनी कोणतेही नवे कौशल्य आत्मसात केले नाही अशा लोकांपेक्षा चांगले परिणाम मिळाले. टेक्नॉलॉजी व फायनान्स क्षेत्रातील कर्मचारी सर्वाधिक स्वखर्ची अपस्किलिंग करणारे (७८.३%) ठरले, जे अनेकदा संस्थेच्या मदतीशिवाय करत होते. दुसरीकडे, विक्री व मार्केटिं गमधील ८०% जणांनी अल्पकालीन सर्टिफिकेट्स आणि ऑनलाइन ट्यूटोरियल्सला प्राधान्य दिले, जे "जस्ट-इन-टाइम" आणि कमी खर्चिक शिक्षण प्रकारांचा वाढता वापर दर्शवते.


टीमलीज एडटेकचे संस्थापक व सीईओ शांतनू रूज म्हणाले, 'या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट होते जे कर्मचारी पुढाकार घेतात, विशेषतः जे स्वतःच्या शिक्षणात गुंतवणूक करतात, त्यांना केवळ नवीन कौशल्येच नाहीत तर ओळख, जबाबदारी आणि खरी करिअर प्रगतीही मिळते. संस्थांसाठी हा एक इशारा आहे की त्यांनी कर्मचाऱ्यांची संस्थेशी निष्ठा वाढवण्यासाठी संरचित अपस्किलिंगमध्ये अधिक गुंतवणूक करावी. तर कर्मचाऱ्यांनी आता पुढाकार घेणे, शहाणपणाने शिकणे आणि दूरगामी विचार करणे गरजेचे आहे.'


नियोक्त्यांनी कर्मचाऱ्यांची संस्थेशी निष्ठा आणि बांधिलकी वाढवण्यासाठी अपस्किलिंग बजेट प्रभावीपणे वापरणे, स्वतःच्या खर्चाने केलेल्या शिक्षण प्रयत्नांची दखल घेणे आणि विशेषतः तंत्रज्ञान व फायनान्ससारख्या उच्च प्रभावी विभागांसाठी संरचित अपस्किलिंग ट्रॅक्स तयार करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षणाची वेळ पारफॉर्मन्स इव्हॅल्युएशनच्या जवळ ठेवल्यास अधिक फायदा होईल, हे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

‘दगडूशेठ हलवाई’च्या गणपतीचा प्रथमच बेल्जियममध्ये दणाणणार जयघोष

गणेशोत्सवात प्रतिकृतीची प्रतिष्ठापना; उत्सवासाठी मूर्ती सुपूर्द पुणे : ‘मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषासह

Asia Cup 2025: हार्दिक पांड्या फिटनेस टेस्ट देणार, श्रेयस अय्यरचे पुनरागमन निश्चित

नवी दिल्ली: आगामी एशिया कप २०२५ स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर सर्वांचे

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे

Skin Care: पावसाळ्यात त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरतो कडुलिंब

मुंबई: पावसाळा सुरू झाला की, वातावरणातील ओलावा आणि आर्द्रता वाढते. यामुळे त्वचे

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी