Stock Market Update: शेअर बाजारातील गुंतवणूकदार ' अलर्ट ' मोडवर सेन्सेक्स ७०.७४ व निफ्टी ६५.०५ अंकांनी कोसळला !

  60

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण सुरू झाली आहे. भल्या सकाळी गिफ्ट निफ्टीच्या नकारात्मक संकेतानुसार ही पडझड सुरु झाली. सकाळी गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) ०.१५% पडल्यानंतर बाजारात पडझड सुरू झाली. सेन्सेक्स (Sensex 50) निर्देशांक ७०.७४ अंकांनी घसरण होत पातळी ८१४८५.८८ पोहोचली तर निफ्टी (Nifty 50) निर्देशांक ६५.०५ अंकानी घसरत २४७८८.३५ पातळीवर पोहोचला आहे.


आज सकाळी सेन्सेक्स बँक निर्देशांकात १७७.८८ अंकांने पडझड झाली आहे तर बँक निफ्टी (Bank Nifty) मध्ये ७०.३० अंकांने पडझड होत ५५६४३.८० पातळीवर निर्देशांक पोहोचला. बीएसई (BSE) मिडकॅप ०.२५%, स्मॉलकॅप निर्देशांकात ०.६५% घट झाली. निफ्टी मिडकॅप (०.१८%), स्मॉलकॅप निर्देशांकात ०.३७% घसरण झाली आहे.


एनएसई (NSE) निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये रिअल्टी (०.५२%), तेल व गॅस (०.१८%), आयटी (०.३३%) समभागात (Shares) वाढ झाली आहे तर घसरण मिडिया (०.४८%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.४७%) समभागात सर्वाधिक घसरण झाली.


आज बाजारातील मध्यपूर्वेतील दबाव कायम असतानाच भारतात अमेरिकन फेडकडे लक्ष केंद्रित झाले आहे.आज युएस फेडरल रिझर्व्ह बँक आपल्या व्याजदरात कपात करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. फेडचे गर्व्हनर अध्यक्ष जेरोमी पॉवेल  या संदर्भातील निर्णय माध्यमांसमोर जाहीर करतील. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम भारतावर होऊ शकतो. मात्र यावेळी व्याजदरात कपात होण्याची शक्यता तज्ञांनी फेटाळली आहे. त्यांच्या मते यावेळी व्याजदरात कुठलाही बदल होणार नाही. याशिवाय कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर व चलन साठयावरही बाजाराचे लक्ष अवलंबून आहे. अमेरिकन बाजारातील तेलाच्या निर्देशांकात होणारी घसरण पाहून गुंतवणूकदार आपले लक्ष आय टी समभागात केंद्रित करतील असा कयास मांडला जातोय.


मंगळवारच्या सुरुवातीच्या सत्रात NASDAQ, S &P 500, Dow Jones Futures या सगळ्या निर्देशांकात १% घसरण झाली. परिणामी भारतीय बाजारात त्याचा फटका बसल्याने भारतीय व आशियाई बाजारातील निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळाला व निर्देशांकातही घसरण झाली.


आज सकाळच्या सुरुवाती सत्रात सर्वाधिक वाढ एलगी इक्विपमेंट (४.८७%), इंडसइंड बँक (३.७५%), रेडिंगटन (३.२८%), एससीआय (३.१४%), विशाल मेगामार्ट (३.०६%), युनो मिंडा (२.६२%), जेएम फायनांशियल सर्विसेस (१.९३%), मारूती सुझुकी (०.६७%), महिंद्रा अँड महिंद्रा (०.७७%), डीएलएफ (१.१८%), चोलामंडलम फायनान्स (०.८७%), ट्रेंट (०.७१%) या समभागात वाढ झाली. तर हिंदुस्थान झिंक (५.९२%), एमएमटीसी (२.१६%), आयटीआय (१.७५%), तानला प्लॅटफॉर्म (१.६६%), टाटा टेलिकम्युनिकेशन (१.६३%), माझगाव डॉक (१.०२%), कोटक महिंद्रा (०.८७%), वरूण बेवरेजेस (०.६६%), इंटरग्लोब एव्हिएशन (०.४४%), अदानी पॉवर (०.४४%), पॉवर ग्रीड (०.४३%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (०.४२%), एनटीपीसी (०.४२%), जेएसडब्लू स्टील (०.४०%), एचडीएफसी बँक (०.१९%) या समभागात घसरण झाली.


एकंदरीत बाजारात सध्या रोलरकोस्टर स्थित्यंतरातून जाताना गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्ह व्याजदर व मध्यपूर्वेकडील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे त्यांनी गुंतवणूकीसाठी सावध पवित्रा घेतलेला दिसतोय.

Comments
Add Comment

Square Yards चा आर्थिक तिमाही निकाल जाहीर! कंपनीच्या महसूलात ४५% वाढ तर ईबीटा ११३% वाढला

मोहित सोमण:देशातील मोठा रिअल इस्टेट क्षेत्रातील ऑनलाईन व्यासपीठ (Platform) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्क्वेअर यार्ड (Square

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

बँक ऑफ इंडियाकडून आता अनिल अंबानी 'Fraud' घोषित आरकॉमकडून आरोपांचे खंडन म्हणाले,'हे प्रकरण..

प्रतिनिधी:उद्योगपती अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का बसला आहे. विघ्नाचे शुक्लकाष्ट संपत नाही तोपर्यंत आता

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या