BMC Election News: शिवसेना लढणार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीएमसी निवडणूक

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भातील शिवसेनेचे सर्व निर्णय खासदार श्रीकांत शिंदे घेणार!


मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) ऑक्टोबर किंवा त्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. या निवडणुका शिवसेना पक्ष श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढणार आहे अशी माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या तयारीसंदर्भात त्यांनी आज वरळी येथे महत्त्वाची बैठक घेतली. दरम्यान, शुक्रवारी श्रीकांत शिंदे मुंबई महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उबाठा गटाची सत्ता आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून घ्यायचे  एकनाथ शिंदे यांचे लक्ष्य आहे. त्यासाठी शाखाप्रमुखांसह अनेक बदल सर्व ठिकाणी केले जात आहेत, आणि याबद्दल सर्वतोपरी निर्णय श्रीकांत शिंदे घेणार आहे. तर उबाठा गटाचे नेतृत्व हे आदित्य ठाकरे करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदें तयारीला लागले आहेत.  निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी त्याची वाट न पाहता, त्यांनी पक्षातील मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केले आहे. ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकर यांना देण्यात आली आहे, तर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर असेल.  विदर्भ फत्ते करण्याची जबाबदारी संजय राठोड आणि आशिष जैस्वाल यांच्यावर असेल तर मुंबई, नवी मुंबई आणि कोकणसाठी  उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना काम करावे लागणार आहे.

Comments
Add Comment

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे