रानबाजिरे धरणात देवळे धरणातील लालमाती, गाळाचे पाणी

बॅकवॉटरचा जलाशय यंदा होणार उथळ


शैलेश पालकर


पोलादपूर : महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे येथील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये यंदा देवळे धरणाचे लालमाती गाळाचे पाणी वाहून आल्याने यावर्षी बॅकवॉटरचा जलाशय उथळ होणार आहे. यामुळे एमआयडीसीने तातडीने या बॅकवॉटरच्या जलाशयातील गाळाचा उपसा करण्याची गरज निर्माण झाली आहे.


पोलादपूर नजिकच्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. देवळे लघुपाटबंधारे धरण प्रकल्प योजनेच्या दुसऱ्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामाची सुरुवात मार्च १९९७ मध्ये झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १९९८ मध्ये योजनेचे काम बंद केले होते.


साधारणत: २००१ मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे २००३ मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरुवात केली. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतली असता धरणाची गळती सुरू झाली. यानंतर २७ मे २०२४ रोजी आमदार व विद्यमान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने ८७ कोटींचे धरण बांधण्याची घोषणा केली. यंदा पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील धरण मुळापासून उच्चाटन करण्यात आल्याने सावित्री नदीपात्रावरील या धरणाचे अस्तित्वच संपुष्टात आले. या धरणाचा बांध, त्यावरील दगडी पिचिंग, एकमेव लोखंडी दरवाजा, जलाशयातील माती असा सर्वच परिसर यंदा पूर्णपणे गायब झाला आहे.


परिणामी, रानबाजिरे धरण यावर्षीपासून सावित्री नदीपात्रावरील एकमेव धरण ठरले. यंदा रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरच्या जलाशयामध्ये देवळे धरणापासून मोठ्या प्रमाणात लालमाती आणि गाळ वाहून घेणारे सावित्री नदीचे पात्र येऊन सर्व सहा सांडव्यातून मोठ्या प्रमाणात गाळासह पाण्याचा विसर्ग सुरू आहे. देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने धरण बांधण्याची घोषणा केल्यानुसार सद्यस्थितीत देवळे धरण पूर्णपणे गायब झाले असून रानबाजिरे धरण हेच सावित्री नदीवरील पोलादपूर तालुक्यातील एकमेव धरण राहिले आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.