मेट्रो लाईन १ वर क्यूआर तिकीट प्रणाली सुरू

प्रवाशांसाठी सुरळीत प्रवासाचा अनुभव


नवी मुंबई  : कॉमन मोबिलिटी सोल्युशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, सिडकोने नवी मुंबई मेट्रो लाईन १ वर कालपासून पेपर क्यूआर तिकीट प्रणाली यशस्वीपणे सुरू केली आहे. ही नावीन्यपूर्ण तिकीट प्रणाली ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणालीचे अद्ययावतीकरण करून साकारण्यात आली आहे, जे नव्या गरजांना पूरक आहे. या प्रणालीचे उद्घाटन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, शान्तनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संतोष ओंभासे, अधिक्षक अभियंता, सिडको, मिलींद रावराणे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनेन्स), हरीश गुप्ता, कार्यकारी संचालक, महामेट्रो व अन्य अधिकारी उपस्थित होते.


क्यूआर आधारित तिकीट प्रणालीची आज बेलापूर मेट्रो स्थानकावर अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना जलद, सुलभ व सुरळीत प्रवास अनुभव प्रदान करणे हा आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी सिडकोतर्फे भविष्यात लवकरच आणखीन काही नवीन सुविधा देखील समाविष्ट केल्या जाणार आहेत. यामध्ये मोबाईल तिकीटिंग अ‍ॅपचा समावेश आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून भविष्यात प्रवाशांना मेट्रोची तिकीटे खरेदी करता येतील.


आगामी व्हॉट्सॲप आधारित तिकीट सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना थेट व्हॉट्सॲपद्वारे तिकीटे खरेदी करता येतील. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या माध्यमातून भविष्यात एकसंध पेमेंट सोल्युशन अंतर्गत विविध वाहतूक सेवा एकत्रितपणे वापरता येऊ शकतील. या सर्व सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. ही क्यू आर आधारित तिकीट प्रणाली मेसर्स औरियन प्रो सोल्युशन्स प्रा. लि. यांनी तयार केली असून, सिडको आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यास सिडको कटीबद्ध असून क्यू आर आधारित तिकीट प्रणालीचा प्रारंभ हे त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून