पावसाळी अपघात टाळण्यासाठी रायगड पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

रायगड: माणगाव तालुक्यात पावसाळी पर्यटनस्थळांवर वाढत्या अपघातांची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाद्वारे पर्यटकांसाठी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. ज्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पावसाळ्यात सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण असलेले देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हीणी घाट परिसरासह रायगड येथील इतर प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.


पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार पर्यटकांनी धबधब्यांच्या परिसरात दारूचे सेवन करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा रिल्स बनवणे, उधळपट्टी करणे अशा कृतींना पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.



सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक


पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य अनुभवताना सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून, पर्यटकांनी नियमांचे पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचे 'मिशन मुंबई महापालिका'

कडोंमपा, उल्हासनगरमध्ये भाजपला ‘चेकमेट’ करण्याचा डाव ठाणे/ कल्याण/ उल्हासनगर : मुंबई महानगरपालिकेच्या

कडोंमपातील उबाठाचे ४ नगरसेवक फुटल्याची चर्चा

७ नगरसेवक गट नोंदणीसाठी हजर कल्याण : कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या निकालानंतर स्थानिक राजकीय नाट्याची

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी