केदारनाथच्या मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर भूस्खलन झाले. भूस्खलन होऊन डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि मोठे दगड कोसळले. जंगलचट्टी घाटाजवळील डोंगराच्या माथ्यावरून दगड - मातीचा ढिगारा खाली आला. या ढिगाऱ्याखाली दबून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. अपघाताच्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. याआधीही दोन दिवसांपूर्वी पावसामुळे केदारनाथ मार्गावर अपघात झाला होता.

केदारनाथ मार्गावर १८ जून रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी जंगलचट्टी गधेरेजवळ डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि दगड कोसळले. या अपघातात पाच लोक ढिगाऱ्याखाली आले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ जंगलचट्टी येथील पोलिसांनी आणि डीडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. मदतकार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता आणि इतर तीन जण जखमी होते.

केदारनाथ भागात मोठा पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे मार्गावर अनेक ठिकाणी अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
Comments
Add Comment

Supreme Court : 'मादर***' आणि 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचा अजब दावा

नवी दिल्ली : शिवीगाळ आणि अश्लीलतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मोठा निर्णय

Infiltration Bid Foiled In J&K : LoC वर पुन्हा तणाव! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच गोळीबार; राजौरीमधील पाकिस्तानाचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली

PM Narendra Modi : 'अंतराळात नवे झाड...'; Vikram-1 च्या ऐतिहासिक भरारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कायरोट टीमशी थेट संवाद!

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय (ऑर्बिटल-क्लास) रॉकेट 'विक्रम-1' (Vikram-1) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर,

Healthy Skin : महागड्या क्रीमची गरज नाही! 'हे' पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक तेज

त्वचेचं सौंदर्य फक्त महागड्या उत्पादनांमुळे नाही, तर योग्य आहारामुळेही वाढतं. काही पौष्टिक पदार्थ त्वचेला आतून

Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! 'विक्रम-1' या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारताच्या अवकाश (Space) क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेस (Skyroot

Shashi Tharoor : लिफ्टमध्ये अडकले शशी थरूर; १५ मिनिटांनंतर अग्निशमन दलाने केली सुटका

तिरुवनंतपुरम : काँग्रेसचे खासदार (Congress MP) शशी थरूर (Shashi Tharoor) शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील (Kerala) एका हॉटेलच्या