Jarann movie box office collection 2nd week : फुल ढिंचॅक माऊथ पब्लिसिटी! ‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी

मुंबई : वर्ड ऑफ माऊथ, दमदार अभिनय, वास्तवाशी नाते सांगणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘जारण’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.


अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने या कथेला भावनिक उंची मिळाली असून, त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर दोघींच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीमुळे चित्रपटगृहात शोज वाढवले जात आहेत आणि प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. कथानकातील सत्यता, भावनांची खोली, आणि उत्तम सादरीकरण यामुळे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे.



चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, ‘जारण’ सारखा संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर सादर केला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचा खूप आनंद होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांनी कथा आणि सादरीकरणाचं कौतुक केलं, हे एखाद्या दिग्दर्शकासाठी अत्यंत समाधानकारक आहे. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शाबासकी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देते.” निर्माते अमोल भगत म्हणतात, “चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहून मन भरून येते. थिएटर्समध्ये वाढणारे शो, बॉक्स ऑफिसवर वाढती आकडेवारी, आणि सोशल मीडियावरचा सकारात्मक प्रतिसाद हे सर्व पाहाता खरच खूप आनंद होतो. हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे आहे.“


अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’चे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि

“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला