Indian Economy: जागतिक आर्थिक संकटातही भारताने चांगला विकास दर राखला - मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेस्वरन

प्रतिनिधी: जगभरात प्रतिकूल परिस्थिती असतानाही भारताने चांगला विकास दर राखला आहे असे प्रतिपादन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेस्वरन यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 'सध्याच्या संकटाच्या काळातही भारत चांगल्या प्रकारे मार्गेक्रमण करत आहे. जागतिक स्थिती अस्थिरत असतानाही आपण चांगली कामगिरी करत आहोत. राजकीय व आर्थिक स्थिती पाहता विकास दर वाढीसाठी अनुकूल नाही. अजूनही अस्थिरता कायम आहे त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकीला तत्काळ स्थगिती देऊ शकतात 'असे त्यांनी यापुढे म्हटले आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.


जागतिक बँकेच्या अहवालावर बोलताना ते म्हणाले की, ' सध्या आताच सांगणे कठीण आहे की आताची परिस्थिती २००८ आर्थिक मंदीसारखी आहे का? मला नाही वाटत २००९ सारखी जागतिक मंदी पातळी आता आहे.गेल्या ७ वर्षातला विकास दरवृद्धीसाठी हा संथ काळ आहे. काही विशिष्ट बाबतीत २००८ वैश्विक मंदीपेक्षा प्रतिकूल प्रभाव असू शकतो मात्र हा पुढेही पसारू शकतो.'


यापुढे त्यांनी म्हटले होते की, सध्याची एकत्रित परिस्थिती पाहता,भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६.५% विकासदर कायय राखला आहे व आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा दर ६.३ ते ६.८% पातळीवर राहू शकतो असा आमचा अंदाज आहे.'


जागतिक व्यापार (Trading) परिस्थितीवर सकारात्मक भाष्य करताना नागेस्वर न म्हणाले, ' आपली जागतिक मुत्सद्दीपणा, पेट्रोलियम मंत्रालय, पंतप्रधान मोदींचे प्रयत्न, परराष्ट्र मंत्रालय यांच्या एकत्रित परिणाम म्हणून निश्चित आहे की भारतीय उर्जा क्षेत्रात पुरवठा प्रभावित होणार नाही. आपली जगभरातील प्रतिमा आश्वासक असल्याने आपण उत्तम मध्यस्थ (Mediator) आहोत. त्यामुळे प्रत्येक जगातील देशाला भारताच्या प्रतिष्ठेशी संलग्न व्हायचे आहे.'


आर्थिक स्थितीवर बोलताना ते पुढे म्हणाले,' व्यापाऱ्यांच्या घडामोडी बघताना भारत आयात शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे जेणेकरून घरगुती उत्पादनाच्या किंमतीही नियंत्रणात राहतील. जागतिक परिस्थितीचा फायदा घेताना आपल्या देशात शिक्षण, कौशल्य विकास,खनिज उत्पादन यावर गुंतवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.भारताचे उत्पादन,सेवा क्षेत्रातील प्राथमिक अस्तित्व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे' असे त्यांनी म्हटले.


दरम्यान नुकताच जागतिक बँकेचा अहवाल प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकीय आर्थिक स्थितीबाबत व्यक्त होताना जागतिक अर्थव्यवस्थेवरही विस्तृत भाष्य केले होते. अहवालात म्हटल्याप्रमाणे, यंदा २००८ साली उद्भवलेल्या जागतिक मंदीची नांदी दिसून येते. त्यावर भाष्य करताना भारताचे मुख्य आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्ही अनंथ नागेस्वरन यांनी भारताची जागतिक संकटाच्या काळातही होणारी आर्थिक प्रगती ठळकपणे मांडली.

Comments
Add Comment

Delhi bomb blast case: दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश, २० हून अधिक अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटानंतर दिल्लीमध्ये

अमित शाहांशी बोलले एकनाथ शिंदे, महायुतीतला संघर्ष टाळण्यासाठी केली चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

इंदुरीकर महाराज झाले नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी

मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या

भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस