प्रहार    

Monsoon Hair Care : पावसामुळे केस झालेत राठ? केसांची ‘अशी’ घ्या काळजी...

  69

Monsoon Hair Care : पावसामुळे केस झालेत राठ? केसांची अशी घ्या काळजी...

ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूंमध्ये केसांची काळजी घ्यावीच लागते. पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित समस्या वाढतात. यासोबतच केस खडबडीत होण्याची आणि गळण्याची समस्याही वाढू लागते. पावसात भिजल्याने टाळूमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका देखील जास्त प्रमाणात असतो. अनेकांना पावसाळ्यात केसगळतीचा त्रास होतो. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी, त्यांची योग्य निगा राखणे आवश्यक असते. या पावसाळ्यात अनेकजणींना केसांच्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात केस गळणे आणि तुटण्याची समस्या अधिक वाढते. केस ड्राय, रखरखीत, दिवसाआड चिकट होणे अशा समस्याही वाढू लागतात. कोंडा ही देखील या ऋतूतील सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी हे पाहूयात आजच्या या लेखातून.

१. पावसाच्या पाण्यापासून केसांचे संरक्षण करा

पावसाळ्यात बाहेर येता - जाता आपले केस भिजतात, केस भिजल्यामुळे अधिक तुटतात. हे टाळायचे असल्यास केस पावसात भिजल्यावर घरी आल्यानंतर लगेच कोमट पाण्याने केस धुवावेत. केसांना शाम्पू लावून २ ते ५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. थोड्यावेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवा, असे केल्याने केसांमधील घाण पूर्णपणे साफ होईल.

२. तेलाने मसाज करा

शाम्पूच्या १५ मिनिटे आधी खोबरेल तेल लावल्याने केस प्री - कंडिशनिंग होण्यास मदत होते. त्यामुळे स्कॅल्पचा कोरडेपणाही कमी होतो.

३. संसर्ग टाळा

पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी केस आणि स्कॅल्पसाठी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करावा जे संक्रमणापासून केसांचे संरक्षण करु शकतील. कोरफड, मेथी आणि आवळा यांसारख्या गोष्टी पावसाळ्यात संसर्गापासून केसांचे संरक्षण करतात. आपला कंगवा कोणाशीही शेअर करू नका, यामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.

४. केशरचनेची काळजी

पावसाच्या पाण्यांत भिजून केस ओले होऊ नयेत म्हणून हाय पोनीटेल किंवा बन अशा हेअर स्टाईल करा. यामुळे तुमचे केस गळण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर स्कॅल्पला खाज येणे आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यास मदत होईल.

५. योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा

पावसाळ्यात आपले केस अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. वातावरणातील अधिक आर्द्रतेमुळे केसांची चमक आणि व्हॉल्युम कमी होते. अशावेळी केसांना सूट होईल असा शॅम्पू आणि कंडिशनर निवडा. शाम्पूनंतर कंडिशनर लावा आणि ओल्या केसांवर चांगले हेअर सीरम वापरा यामुळे तुमचे कसे फ्रिजी होणार नाहीत.

Comments
Add Comment

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची