Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात पुन्हा उसळी ' इतक्याने' सोने महाग ! चांदीत किरकोळ वाढ

प्रतिनिधी: आज सोन्याने पुन्हा उसळी घेतली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्याने आज पुन्हा उसळी घेतली आहे. मध्यपूर्वेतील दबावाचा फटका कच्च्या तेलाच्या निर्देशांकात दिसत असताना सोन्याच्या निर्देशांकात मात्र वाढ झाली आहे. आं तरराष्ट्रीय बाजारातील सकाळी सुरूवातीला सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली.'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५४ रुपये वाढल्याने ग्रॅमचे दर १००९१ रूपयांवर आहेत. तर २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ५४० रूपयांनी वाढत किंमत १००९१० पातळीवर गेली.२२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ५० रूपयांनी वाढत ९२५० रूपये पातळीवर पोहोचली तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ४०० रूपयांनी वाढत ९२५०० रुपये पातळीवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ४१ रुपयांनी वाढ झाल्याने दर पातळी ७५६९ रूपयांवर पोहोचली तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४१० रूपयांनी वाढत ७५६९० रूपयांवर पोहोचली आहे.


आज एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोने निर्देशांकात ०.१९% घसरण झाली त्यामुळे पातळी ९९३५० रुपयांवर पोहोचली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव कायम असतानाच गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) मध्ये ०.०९% घसरण झाली होती.भारतीय मुख्य शहरातील सराफा बाजारात सोन्याच्या सरासरी किंमत २४ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम १००९१ रूपये होती तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९२५० व १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७६१५ रुपये आहे. आज जागतिक पातळीवर सोन्याचा ऑगस्ट वायदा करार ०.३७% वाढीसह ९९,५४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावला आणि चांदीचा जुलै वायदा करार २.२८% वाढीसह १,०८,९९५ रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावला आहे. सोने चांदीच्या किंमतीत आज प्रचंड अस्थिरता (Volatility) दिसली.


चांदीच्या दरातही वाढ !


चांदीच्या दरात प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने वाढ झाली आहे. तर प्रति किलो चांदीची किंमत १००० रुपयांनी वाढत १११००० रूपयांवर पोहोचली आहे. भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींनुसार निश्चित केली जाते, ज्या दोन्ही दिशेने वेळोवेळी वाटचाल करत असतात .त्याशिवाय ते डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चलनाच्या हालचालीवर देखील अवलंबून असते. जर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि आंतरराष्ट्रीय किमती स्थिर राहिल्या तर चांदी अधिक महाग होत असते.


एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.६०% वाढ झाल्याने दर पातळी १०९६५४.०० रुपयांवर पोहोचली आहे. आज एकूणच बाजारातील चित्र पाहता सोन्याच्या व चांदीच्या दरात अस्थिरता अधिक राहू शकते.

Comments
Add Comment

मुंबईत नवा विक्रम! २०२५ मध्ये १४ वर्षांतील मालमत्ता नोंदणीत सर्वाधिक वाढ

Knight Frank अहवालात स्पष्ट मुंबई: एकीकडे मुंबईच्या बाबतीत घरांचे मूल्यांकन वाढत असल्याचे आपण पाहिले होते. आता नव्या

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

वर्षाची सुरुवात शेअर बाजारात वाढीनेच सेन्सेक्स १५७.९० व निफ्टी ४२.३५ अंकांने उसळला

मोहित सोमण: वर्षांचा पहिला दिवसही तेजीतच दिसत आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या