Jems Jwellery Export: मे महिन्यात भारताच्या जेम्स व ज्वेलरी निर्यातीत १५ घट; हिऱ्यांच्या निर्यातीत मोठी घसरण - GJEPC

प्रतिनिधी: आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील मे महिन्यात जेम्स व ज्वेलरी (Gems & Jwellery) मधील निर्यातीत घट झाली आहे. निर्यातीत मे मध्ये १५.८१% घट झाली असल्याचे जेवेल्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिलने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मागील वर्षाच्या मे महिन्यातील २६८८.३८ दशलक्ष डॉलर्सवरून या वर्षी मे महिन्यात २२६३.४२ दशलक्ष डॉलर्सवर घसरण झाली आहे.संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या स्थूल आयातीत (Gross Imports) मध्येही घट झाली आहे. मागील वर्षाच्या मे महिन्यातील तुलनेत यंदा मे महिन्यात १२.९६% टक्के घसरण झाली आहे.

जेम्स व ज्वेलरीमध्ये एप्रिल महिन्यात, मागील वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत ७.४४% वाढ झाली होती. हिरा निर्यातीत या वर्षी मे महिन्यात मागच्या वर्षीच्या मे महिन्यापेक्षा ३५.४९% घसरण झाली. मागील मे महिन्यातील १४७२.०८ दशलक्ष डॉलर्स वरून घटत या मे महिन्यात त्यांचे मूल्यांकन ९४९.७० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचले आहे. हिरा आयातीतही मे महिन्यात मागील वर्षीच्या मे तुलनेत ३९.९५% घट झाली आहे. ही घट २९.३३ वरून घटत १७.६१ दशलक्षावर गेली आहे.

सोन्याच्या बाबतीतही, सोन्याच्या निर्यातीत सोन्याच्या दागिन्यांची निर्यात इयर ऑन इयर (YoY) बेसिसवर १७.२४% वाढून ९९७.५० दशलक्ष डॉलर्सवर झाली आहे जी आधी ८५०.८१ दशलक्ष डॉलर्स होती.

जीजेईपीसी या वाढीचे श्रेय घालण्यायोग्य सोन्याच्या वाढत्या जागतिक मागणीला देत आहे. जेम्स (रंगीत खडे) निर्यातीत १.१३% ची किरकोळ घट झाली, जी गेल्या वर्षीच्या ६३.२२ दशलक्ष डॉलर्सवरून (५२७.३६ कोटी) ६२.५१ दशलक्ष डॉलर्स वर झाली.

कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची निर्यात ३५.४९% ने घसरून ९४९.७० दशलक्ष डॉलर्सवर झाली, जी गेल्या आर्थिक वर्षी १,४७२.०८ दशलक्ष डॉलर्स होती. या श्रेणीतील आयातही ३८.७६% ने घसरून ८४.८० दशलक्ष डॉलर्स झाली आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दररोजच्या वाढत्या मागणीमुळे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रतिकूल परिस्थितीमुळे ही वाढ होत आहे. परिणामी बाजारातील घटत्या मार्जिनबरोबर सोन्याच्या घटत्या निर्यातीबरोबरच मागणीतही वाढ झाल्याने बाजाराला फटका बसला आहे.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.