मुंबईतील १३८५ रस्त्यांचे दोन वर्षांत काँक्रिटीकरण

दोन टप्प्यांत ७७१ रस्त्यांचे काम झाले पूर्ण


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ६१४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.


निर्धारित कालमबदित, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करुन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक नियोजन करून सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. महत्त्वाकांक्षी अशा रस्ते कॉक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत टप्पा एक आणि टप्पा दोनमध्ये एकूण मिळून २,१२१ रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले, ज्यामध्ये ६९८.४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे.


काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही संस्थेस खोदकाम, चर करायला मनाई करण्यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेतर्फे खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य, रस्तारोधक हटविण्यात आले असून रस्ते संपूर्णतः वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या देखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विभाग कार्यालयांकडून रस्त्यांवरील अधिकृत गतिरोधकांची यादी प्राप्त झाल्यानंतर गतिरोधकांची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Weather : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज (22 जून 2026) सकाळपासून जोरदार पावसाला (Rains) सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3

International Yoga day : योग हे समाजाला जोडण्याचे माध्यम

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त मत मुंबई (विशेष प्रतिनिधी ) योगचा

BMC : उत्कृष्ट शासकीय प्रकल्प निर्मितीमध्ये नागरिकांचा सहभाग आणि देखरेख यांना महत्त्व

लिबर्टी उद्यान महानगरपालिका शालेय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे उद्गार मुंबई :

BMC News : मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर उतारा

हिंदमाता, मिलन सबवेच्या धर्तीवर भूमिगत टाकी बांधून ठाणे खाडीत सोडणार मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी मुंबई

BMC : घाटकोपरमधील जाहिरात फलक दुघर्टना: क्रेन आणि क्रशरचा खर्च सुमारे ४१ लाख रुपये

दोन वर्षांनी राडारोडा उचलेल्या खचाची झाली आठवण मुंबई(विशेष प्रतिनिधी) मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथील महाकाय

DCM Eknath Shinde : बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी