मुंबईतील १३८५ रस्त्यांचे दोन वर्षांत काँक्रिटीकरण

दोन टप्प्यांत ७७१ रस्त्यांचे काम झाले पूर्ण


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ६१४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.


निर्धारित कालमबदित, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करुन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक नियोजन करून सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. महत्त्वाकांक्षी अशा रस्ते कॉक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत टप्पा एक आणि टप्पा दोनमध्ये एकूण मिळून २,१२१ रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले, ज्यामध्ये ६९८.४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे.


काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही संस्थेस खोदकाम, चर करायला मनाई करण्यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेतर्फे खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य, रस्तारोधक हटविण्यात आले असून रस्ते संपूर्णतः वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या देखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विभाग कार्यालयांकडून रस्त्यांवरील अधिकृत गतिरोधकांची यादी प्राप्त झाल्यानंतर गतिरोधकांची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या