इस्त्रायल-इराण यांच्यातील युद्धात ट्रम्प यांचा इशारा, तेहरान खाली करा...

नवी दिल्ली: इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप थांबलेले नाही. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इशारा देताना म्हटले की सर्वांनी इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली केले पाहिजे. ट्रम्पने हे ही म्हटले की इराणचे न्यूक्लीयर डील स्वाक्षरी न करण्याचा निर्णय मूर्खतेचा आहे.


 



अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणबाबत पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, इराणने त्या कराराव स्वाक्षऱ्या करायला हव्या होत्या ज्यावर मी सांगितले होती. ही किती शरमेची बाब आहे आणि मानव जीवनाची बर्बादी आहे. सरळ शब्दात सांगायचे तर इराणकडे कोणतेही अणु हत्यार असू शकत नाही. मी वारंवार सांगतोय की तेहरान लगेचच रिकामी केले पाहिजे.

ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचा केला होता दावा


ट्रम्प यांनी नुकताच दावा केला होता की त्यांच्या प्रयत्नांनी इस्त्रायल आणि इराण यांच्यात लवकरच शांतता प्रस्थापित होऊ शकते. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापाऱ्याच्या माध्यमातून तणाव कमी केला होता त्याच पद्धतीने इस्त्रायल आणि इराण यांना बातचीतसाठी टेबलवर आणू शकतो.

ते म्हणाले होते की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापाऱ्याच्या माध्यमातून शांतता आणि स्थिरता आणली. दोन्ही शानदार नेत्यांमधील संघर्ष टळला. इस्त्रायल आणि इराण यांच्यातही तसाच समजुतीचा करार शक्य आहे.
Comments
Add Comment

ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मंजुरी

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा

मिठी मारण्याचा बिझनेस! फक्त ५ मिनिटांसाठी ६०० रुपये!

चीनच्या मोठ्या शहरांमध्ये सध्या एक नवीन आणि वेगळा सोशल ट्रेंड खूप चर्चेत आहे. त्याचे नाव आहे 'मॅन मम'. या

Sheikh Hasina Verdict : हसीना यांना शिक्षा तर ढाकामध्ये 'हिंसेचा भडका'! लोक रस्त्यावर उतरले; पहा राजधानीतील 'तणावाचा VIDEO'

बांगलादेशच्या राजकारणात सध्या ऐतिहासिक आणि अनेकदिशात्मक राजकीय चढ-उतार दिसून येत आहेत. देशाच्या माजी

बांगलादेशच्या न्यायालयाचा निर्णय, शेख हसीना दोषी

ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेश आंतरराष्ट्रीय लवाद या देशांतर्गत

मदिना जवळ बस-टँकर अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू

मक्का मदिना : मदिना जवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि डिझेल टँकर यांची भीषण धडक होऊन ४२ भारतीयांचा मृत्यू

अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एआयचा वापर

आर्टिफिशियल इंटेलिजेंस ओळखणार रस्त्यांवरील रेलिंग, रस्त्यांचे चिन्ह न्यू यॉर्क : अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त