
नवी दिल्ली: इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप थांबलेले नाही. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इशारा देताना म्हटले की सर्वांनी इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली केले पाहिजे. ट्रम्पने हे ही म्हटले की इराणचे न्यूक्लीयर डील स्वाक्षरी न करण्याचा निर्णय मूर्खतेचा आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणबाबत पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, इराणने त्या कराराव स्वाक्षऱ्या करायला हव्या होत्या ज्यावर मी सांगितले होती. ही किती शरमेची बाब आहे आणि मानव जीवनाची बर्बादी आहे. सरळ शब्दात सांगायचे तर इराणकडे कोणतेही अणु हत्यार असू शकत नाही. मी वारंवार सांगतोय की तेहरान लगेचच रिकामी केले पाहिजे.US President Donald Trump posts, "Iran should have signed the 'deal' I told them to sign. What a shame, and a waste of human life. Simply stated, Iran cannot have a nuclear weapon. I said it over and over again! Everyone should immediately evacuate Tehran!" pic.twitter.com/6CxDGGK9m8
— ANI (@ANI) June 16, 2025