Stock Market Update: बाजारात घसरणीचा अर्ली ट्रेंड सेन्सेक्स १९५.६० निफ्टी ५७.२५ अंशाने घसरला मध्यपूर्वेतील दबावाचा फटका !

  36

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात बाजार उघडल्यावरच घसरण सुरु झाली. सकाळी गिफ्ट निफ्टी निर्देशांक (Gift Nifty) मध्ये ०.४०% मोठी घसरण झाल्यानंतर बाजारात एकप्रकारे घसरगुंडी सुरू झाली आहे. मध्यपूर्वेतील वाढ त्या दबावामुळे बाजारात हा अडथळा आल्याचे स्पष्ट चित्र दिसले. सेन्सेक्स (Sensex) १९५.६० अंशाने घसरत ८१६००.५५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकात ५७.२५ अंशाने घसरण होत निफ्टी पातळी २४८८९.२९ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३५.८८ अंशाने वाढ झाली आहे तर बँक निफ्टीत ४६.२५ अंशाने घसरण झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.०३% वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये कुठलीही वाढ किंवा घसरण झालेली नव्हती. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३३%, ०.१५% वाढ झाली आहे.


इंडियन वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (Indian Volatility Index) मध्ये १.०८% घसरण झाली आहे. कालपर्यंत वीआयएक्स निर्देशांक १.४९% पर्यंत खाली गेल्याने बाजारात सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली होती. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये रिअल्टी (१.०९%), मिडिया (०.७६%), पीएसयु बँक (०.७५%), आयटी (०?७६%) समभागात अधिक वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण फार्मा (०.५८%), ऑटो (०.४३%), हेल्थकेअर (०.४४%) या समभागात झाली आहे.


काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 परिषद लवकर आटोपती घेऊन इस्त्राईल व इराण संघर्षावरही भाष्य केले होते. इराणवर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच तेहरानवर हल्ला करुन इस्त्राईलचे पंतप्रधान नित न्याहू यांनी इराणवर गंभीर आरोप करत हल्ला थांबवणार नसल्याचे संकेत दिले होते. काल डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानंतर बाजारात सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली होती. काही प्रमाणात कच्च्या तेलाच्या निर्देशांकातील चढता आलेख घटला होता. परंतु अजूनही मध्यपूर्वेतील लढाईला खतपाणी मिळाल्याने कच्च्या तेलाचा दबाव आगामी काळात दिसू शकतो.


दुसरीकडे भारताने काल घाऊक महागाई निर्देशांकाचे आकडे जाहीर केली ज्यामध्ये गेल्या १४ महिन्यातील घाऊक महागाईतील सर्वाधिक स्वस्ताई मे महिन्यात असल्याचा निर्वाळा केला गेला होता. असे असले तरी बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्यानेही आपली गुंतवणूक काढून घेत आहेत परिणामी बाजारात दबाव पातळी कायम आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून, निर्देशांक आता त्याच्या ९ आणि २० दिवसांच्या EMA च्या वर आरामात स्थित आहे, जो कोणत्याही अल्पकालीन घसरणीसाठी अतिरिक्त आधार (Additional Support) देत आहे.


बाजारात घसरण झाली तरी बीएसई (BSE) मध्ये ३२६९ समभाग (Shares) पैकी २०३३ समभाग तेजीत राहिले आहेत तर १०६५ समभागात घसरण झाली आहे. एनएसई (NSE) मध्ये २५५६ समभागापैकी १६१० समभागात वाढ झाली आहे तर केवळ ८६२ समभागात घसरण झाली आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून, निर्देशांक आता त्याच्या ९ आणि २० दिवसांच्या EMA च्या वर आरामात स्थित आहे, जो कोणत्याही अल्पकालीन घसरणीसाठी अतिरिक्त आधार देतो.


आज सकाळ लेंटट व्ह्यू (Latent View) (५.९१%), तानला प्लॅटफॉर्म (५.३५%), नवीन फ्लूओ इंटरनॅशनल (४.०५%), आयटीआय (३.३४%), क्रिसील (२.५४%), जिलेट इंडिया (२.०१%), सिमेन्स (१.६८%), एशियन पेंटस (१.४७%), मॅक्रोटेक डेव्हलपर (१.५४%), एशियन पेंटस (१.४७%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (०.९८%), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (०.७०%), एनटीपीसी (०.५४%) समभागात वाढ दिसून आली आहे.


तर एससीआय (५.५५%), विशाल मेगामार्ट (४.६३%), ज्युबलिंएट (३.२१%), मन्नपुरम फायनान्स (३.०८%), सन फार्मा (१.८६%), ऑइल व नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (१.४४%), जेएसबब्लू एनर्जी (१.४३%), टाटा मोटर्स (१.१८%), इंडसइंड बँक (०.९७%), इंडसइंड बँक (०.९७%), झायडस लाईफसायन्स (०.८९%), टायटन कंपनी (०.८८%), बजाज फायनान्स (०.८५%) समभागात घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ