Friday, October 31, 2025
Happy Diwali

स्थानिकांना दिलासा ! संरक्षण भिंत पाडणार नाही; राज्य सरकारची हमी...

स्थानिकांना दिलासा ! संरक्षण भिंत पाडणार नाही; राज्य सरकारची हमी...
मुंबई : गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) आणि रेडिओ क्लबदरम्यान प्रस्ताविक जेट्टीसाठी समुद्रलगत असणारी सरंक्षण भिंत ३० जूनपर्यंत पाडणार नाही. अशी हमी राज्य सरकारने स्थानिकांना दिली. त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. कोणतेही अधिकृत परवानगी नसताना, जेट्टीचं काम सुरु करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. त्यामुळे प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सोमवारी पार पाडल्यामुळे राज्य सरकारने स्थानिकांच्या बाजूने दिलासादायक निर्णय घेतला आहे.  त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. जेट्टीच्या प्रकल्पासाठी भिंत पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली असती, तर नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले असते. अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. मुळातच प्रकल्पासाठी भिंत का पाडण्यात येत आहे ?  असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. समुद्रलगत असणारी भिंत ७० वर्ष जुनी आहे. प्रास्ताविक जेट्टीचा प्रकल्प हा सार्वजनिक पायाभूत सुविधा उपक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >