Meghalay Murder Case: राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे सोनमचा एन्काउंटर करण्याची मागणी

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) हिनेच केल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास मेघालय पोलिस करत असून, आज दि. १७ जून रोजी मेघालय पोलिसांनी राजाची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना घटनास्थळी आणले होते. यादरम्यान, दिनांक २३ मे रोजी राजाच्या हत्येचा सीन पुन्हा एकदा तयार करण्यात आला,  त्या दिवशी फक्त १८ मिनिटांत राजा रघुवंशीची हत्या कशी झाली? हे यामुळे उघड झाले. राजा रघुवंशीचे दोन्ही भाऊ मेघालय पोलिसांच्या तपासावर समाधानी दिसत आहेत. आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी राजाचा छोटा भाऊ सचिन रघुवंशीने सोनमला जन्मठेपेची मागणी केली आहे, तर मोठा भाऊ विपिनने सोनम रघुवंशीचा एन्काउंटर करा असे म्हंटले आहे.


मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आरोपी सोनमला आज(दि.१७) घटनास्थळी नेले, तिच्यासोबत इतर आरोपी देखील होते. यावर राजा रघुवंशीचा भाऊ विपिन म्हणाला की, मेघालय पोलिस राजाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगले काम करत आहेत. जर मी सोनमसमोर आलो तर मी तिला विचारेन की तिने राजाला का मारले. मेघालय पोलिस गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहेत, त्यामुळे तपास चांगला चालला आहे. आम्ही या तपासावर खूश आहोत. यावेळी सोनमच्या एन्काउंटरची त्याने मागणी केली. 'हे लोक आता तुरुंगात जातील, नंतर त्यांना पॅरोलवर सोडले जाईल, एन्काउंटर करणे चांगले, त्यांना लगेच संपवा', अशी मागणी त्याने केली.


यावेळी सचिन रघुवंशी म्हणाले की, मी मनापासून म्हणतो की मेघालय पोलिस राजा हत्याकांडाचा तपास खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. आज सोनममुळे मेघालयची बदनामी झाली आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तिला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. सोनमला मरेपर्यंत तुरुंगात ठेवले पाहिजे. दरम्यान, आज पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणले होते. हत्येच्या कटात पत्नी सोनम सहभागी असल्याचे यात निष्पन्न झाले.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र