पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावासाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. जूनच्या सुरवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे शनिवारी काही भागात पावसाचा जोर वाढला.

मुंबईतही रविवारी आणि सोमवारी पावसाने झोडपून काढले. सध्या हवामानात बदल झाल्याने काही ठिकाणी जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील कोकणातील काही भागात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यासहीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर, या भागातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या भागतही हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाचा काही भागात अंदाज व्यक्त केल्याने काही धरणात क्यूसेक 2500 पाण्याचा साठा आहे. त्यामुळे जोरदार पावसाच्या आगमनामुळे धरणाचा क्यूसेक वाढू शकतो.
Comments
Add Comment

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर