RBI : आता सर्व एटीएममधून मिळतील १०० आणि २०० रुपयांच्या नोटा! RBIची मोठी अपडेट

इंटरचेंज फीमध्ये वाढ


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना त्यांच्या एटीएममधून ₹ १०० आणि ₹ २०० च्या लहान नोटा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आता बँकांनी या दिशेने चांगली प्रगती केली आहे. आरबीआयने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम आता बाजारात दिसत आहे. देशातील ७३ टक्के एटीएममधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटांना भरण्यास सुरुवात केली आहे. एका अहवालानुसार, देशातील ७३% एटीएम आता अशा आहेत की किमान एका कॅसेटमधून ₹ १०० किंवा ₹ २०० च्या नोटा वितरित केल्या जात आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये ही संख्या ६५% होती, याचा अर्थ आता सतत सुधारणा होत आहे.


सामान्य लोकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी सहज लहान नोटा मिळाव्यात, जेणेकरून त्यांना गरजेच्या वेळी दुकानांमध्ये किंवा बँकांमध्ये नोटा बदलण्याची समस्या भेडसावू नये, हा RBIचा उद्देश आहे. विशेषतः ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल.



सीएमएस इन्फो सिस्टम्सने दिली महत्वाची माहिती


सीएमएस इन्फो सिस्टम्सचे रोख प्रबंधक अध्यक्ष अनुश राघवन यांनी सांगितले की, नोटांची उपलब्धता सुधारत आहे. ग्राहकांच्या खर्चाचे ६० टक्के प्रमाण आताही रोखीनेच होत आहे. अशा गावखेड्यात खासकरुन १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची उपलब्धता दिवसेंदिवस देवाण-घेवाण संबंधीच्या गरजा थेट पूर्ण करीत आहे. एटीएममध्ये लहान नोटा असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून लोकांना दैनंदिन खरेदी आणि लहान व्यवहारांमध्ये अडचणी येऊ नयेत.




RBI ने ATM कॅश डिस्पेंसचे टार्गेट सेट केले


आरबीआयने एप्रिल २०२५ मध्ये एक परिपत्रक म्हणजेच मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, सर्व बँकांना त्यांच्या एटीएमपैकी किमान ७५% एटीएममध्ये १०० किंवा २०० च्या नोटा वितरित होतील याची खात्री करावी लागेल. त्यानंतर, ३१ मार्च २०२६ पर्यंत हा आकडा ९०% पर्यंत वाढवावा लागेल. यामुळे देशातील बहुतेक एटीएममध्ये लहान चलनी नोटा उपलब्ध होतील, ज्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अधिक सोय मिळेल.




इंटरचेंज फीमध्ये वाढ


RBI ने ATM इंटरचेंज फी वाढविली आहे. त्यामुळे येत्या १ मे, २०२५ पासून एटीएममधून कॅश काढणे अधिक महाग होणार आहे. यामुळे जे दर महिन्याला फ्री ट्रांक्झंशनची लिमिट क्रॉस करतात त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. 'इंटरचेंज फी' एक बँक दुसऱ्या बँकेला एटीएम ट्राक्झंशन प्रोसेस करण्यासाठी पे करीत असतात. आणि याचा भार अखेर युजरवर टाकला जातो. उदाहरणार्थ एचडीएफसी बँकेचा युजर तीन महिने फ्री टांक्झशन प्रोसेस केल्यानंतर एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढतो तेव्हा एचडीएफसीला एक्स्ट्रा विड्रॉलसाठी फि चार्ज करु शकतो..

Comments
Add Comment

तेल आयात सोडा, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

देशात तयार होणार सुखोई सुपरजेट नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा! मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणीविषयी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना

मुंबईकरांच्या सेवेत १५० नवीन इलेक्ट्रिक बेस्ट बस सज्ज!२१ मार्गावर दररोज १.९ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई: मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्य

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी