भारताचा कसोटी कर्णधार न होण्याबाबत जसप्रीत बुमराहने सोडले मौन

लंडन:  जसप्रीत बुमराहने अखेर भारताच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल आपले मौन सोडले आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीची पहिली पसंती तोच होता. मात्र, कामाच्या ताणामुळे त्याने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद नाकरलं असल्याचं बुमराहने स्पष्ट केलं आहे.


रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची भारताच्या कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली. कसोटी संघाचा उपकर्णधार आणि रोहितच्या अनुपस्थितीत तीन कसोटी सामन्यांमध्ये म्हणजेच एक इंग्लंडमध्ये आणि दोन ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा बुमराह रोहित शर्माचा उत्तराधिकारी असायला हवा होता. पण ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटीत त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे सर्व काही बदलले.


जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीत सांगितले की, ‘’रोहित आणि कोहली यांनी गेल्या महिन्यात कसोटी निवृत्तीची घोषणा केली. आणि आयपीएल दरम्यान मी बीसीसीआय अधिकाऱ्यांशी आणि निवड समितीशी आपल्या कामाच्या ताणाबद्दल चर्चा केली होती. डॉक्टर आणि फिजिओंनी मला क्रिकेट कारकीर्दी वाढवण्यासाठी तंदुरुस्तीवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला होता. आणि त्यामुळे मला कर्णधारपद सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला.’’

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत