Bomb Threat Call: नागपूरमध्ये इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, बॉम्बच्या धमकीचा फोन

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी आल्याने एकच खळबळ


नागपूर: आज मंगळवारी दिनांक १७ जून रोजी, कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्स (IndiGo Airlines) च्या विमानात बॉम्बची धमकी (Bomb Threat Call) असल्याचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Flight Emergency Landing) करण्यात आले, जिथे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि विमानाची तपासणी करण्यात आली.


आज सकाळी ९:२० वाजता कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमान क्रमांक ६ई २७०६ मध्ये बॉम्बची धमकी आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार, तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये धमकी गंभीर असल्याची पुष्टी करण्यात आली कारण त्यात फ्लाइट नंबर देखील स्पष्टपणे देण्यात आला होता. तोपर्यंत विमान कोचीहून उड्डाण घेऊन निघाले होते, जे सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर विमानतळावर वळवण्यात आले. सध्या विमान आणि प्रवाशांची चौकशी सुरू आहे.



एअर इंडियाच्या विमानालाही धमकी


तत्पूर्वी शुक्रवाई, थायलंडमधील फुकेतहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-३७९ या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. फुकेत विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन प्रक्रियेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की एअर इंडियाच्या विमानात १५६ प्रवासी होते. विमान फुकेतहून दिल्लीला येत होते शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाने उड्डाण केले, परंतु अंदमान समुद्राभोवती फिरत 20 मिनिटांच्या उड्डाणानंतर, स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३८ वाजता फुकेत विमानतळावर परत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर झालेल्या तपासणीनंतर बॉम्बसारखी कोणतीच गोष्ट विमानात नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना