Gold Silver Rate: गुंतवणूकदारांना बंपर संधी! सोने थेट 'इतक्याने' कमी चांदीत किरकोळ वाढ मध्यपूर्वेतील दबावाचा सोन्याला फटका

प्रतिनिधी: अनेक दिवसांच्या कालावधीनंतर सोन्यात गुंतवणूक करायची बंपर संधी चालून आली आहे. आज सराफाबाजारात मध्यपूर्वेतील दबाव वाढल्यानंतर कच्च्या (Crude) तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असतानाही सोन्याने मात्र दरात घसरण स्विकारली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या प्रमाणात घटलेल्या मागणीमुळे सोन्याचे दर घसरले. 'गुडरिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११४ रूपयांनी घट झाल्याने किंमत १००३७ रुपयांवर पोहोचली आहे तर २४ कॅरेट प्रति तोळा किंमत तब्बल ११४० रूपयांनी घसरल्याने किंमत १००३७० रुपये पातळीवर पोहोचली आहे.


२२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत १०५ रूपयांनी घसरून आज ९२०० रुपयांवर पोहोचली आहे तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत १०५० रूपयांनी घसरुन ९२००० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ८६ रुपयांनी घसरून ७५२८ रुपयांवर पोहोचले आहे तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ८६० रुपयांनी घसरून ७५२८० रूपयांवर पोहोचली आहे.


भारतीय कमोडिटी बाजाराय म्हणजेच एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) वर सोन्याच्या निर्देशांकात घसरण आज किरकोळ ०.०२% वाढ होत निर्देशांक पातळी ९९२०० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये ०.१८ % घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मुख्य लक्ष क्रूड तेलाकडे केंद्रित झाले आहे. दुसरीकडे गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्याने बाजारातील सोन्याच्या मागणीत घट झाली. सोन्याला पर्याय म्हणून चांदीच्या दरात देखील वाढ झाली होती.


चांदीच्या दरात किरकोळ वाढ!


चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीचा स्तर कायम राहिला होता. मात्र काल चांदीच्या दरात कुठलाही बदल झालेला नव्हता. आजही चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. सोन्याला पर्याय व औद्योगिक वापरा त चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर या कारणांमुळे चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात प्रति ग्रॅम किंमत ०.१०% वाढ होऊन दर पातळी ११० रूपयांवर पोहोचली आहे तर प्रति किलो किंमत १०० रुपयांनी वाढत ११०००० रूपयांवर पोहोचली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.३४% वाढ झाल्याने चां दीची पातळी १०६९२५.०० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक अनिश्चिततेमध्ये स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोने ही एक नेहमीच गुंतवणूकीची संधी असते.जी भू-राजकीय जोखमींपासून बचाव म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित करते.

Comments
Add Comment

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची

डी२सी ब्रँड्स आणि क्विस-सर्विस प्‍लॅटफॉर्म्‍स मुंबईतील ग्राहक अर्थव्‍यवस्‍थेला चालना देतात- लिंक्‍डइन

लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमधून निदर्शनास मुंबई:लिंक्‍डइन (Linkedin) या वैश्विक पातळीवरील मोठ्या

डीपी वर्ल्ड पायाभूत सुविधा परिसंस्थेसाठी भारतात ५ अब्ज डॉलर्स गुंतवणार !

गेल्या तीन दशकांमध्ये केलेल्या ३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीला चालना मुंबई: डीपी वर्ल्डने भारतात ५ अब्ज डॉलर्सची

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर

मोंथा चक्रीवादळाचे १२ बळी

अनेक भागात पूरसदृश स्थिती तेलंगणा : मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे

भारत - अमेरिकेत १० वर्षांचा संरक्षण करार

क्वालालंपूर : भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षांसाठी सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण