Gangster Couple: ऐकावं ते नवलच! गँगस्टर काला जठेडी तुरुंगात राहून बनणार बाबा, आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे बाळ जन्माला घालणार

  73

गेल्यावर्षी अनुराधा चौधरी उर्फ 'रिव्हॉल्व्हर राणी'  सोबत केले लग्न,  आता हे गँगस्टर दाम्पत्य दूर राहून वंश वाढवणार!

कुख्यात गुंड संदीप उर्फ ​​काला जठेडी याने गेल्यावर्षी लेडी डॉन अनुराधा चौधरी हिच्यासोबत तुरुंगात लग्न केले होते. त्यानंतर आता त्याला बाबा व्हायचं आहे. मात्र काला जठेडी हा तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे, तर त्याची पत्नी ती सुद्धा गँगस्टर पण बाहेर खुलेआम फिरत आहे. असे हे गँगस्टर दाम्पत्य सध्या आपला वंश पुढे वाढवण्याचा विचार करत आहे. पण या दोघांना लग्नानंतर एकत्र राहताच आले नसल्यामुळे, तसे होणं अशक्यप्राय असल्यामुळे, आता थेट आयव्हीएफ द्वारे हे दाम्पत्य आई बाबा होण्याचा विचार करत आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी न्यायालयाकडून मंजूरी घेत जठेडीने आज तुरुंगातूनच आयव्हीएफ चाचण्या केल्या. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) दीपक वासन यांनी संदीप उर्फ ​​काला जठेडीचा अर्ज स्वीकारला असून जठेडीचे शुक्राणू घेण्यात आले आहेत. वासन यांनी ९ जून रोजी आदेश दिले होते.

आयव्हीएफ उपचारांशी संबंधित वैद्यकीय प्रक्रियेसाठी अंतरिम कस्टडी पॅरोलची मागणी करणारी जठेदीची याचिका न्यायालयाने यापूर्वी मंजूर केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक वालसन यांनी जठेडी यांच्या सहा तासांच्या अंतरिम कस्टडी पॅरोलच्या याचिकेवर सुनावणी केली जेणेकरून तो त्वरित वैद्यकीय प्रक्रिया पार पाडू शकेल. . परंतू, कोर्टाने त्याची तुरुंगातच सोय करून दिली. न्यायालयाने एम्स आणि आरएमएल रुग्णालयाकडूनही अहवाल मागितला होता. एम्सने तुरुंगात हे काम करता येईल असे म्हटले होते. यामुळे जठेडीला बाहेर जाता आले नाही.  गुरुग्रामच्या आयव्हीएफ सेंटरमध्ये लेडी डॉनवर आयव्हीएफ ट्रिटमेंट केली जात होती. तिथेच हे शुक्राणू नेण्यात आले.  

कोण आहे गँगस्टर काला जठेडीची पत्नी?

अनुराधा चौधरी उर्फ ​​'रिव्हॉल्व्हर राणी' ही राजस्थानातील सिकर येथील कुख्यात महिला डॉन आहे. एमबीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या अनुराधाने शेअर ट्रेडिंगपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती परंतु कर्ज आणि फसवणुकीनंतर तिने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. गँगस्टर आनंदपाल सिंगची सहकारी बनून ती 'मॅडम मिंज' म्हणून प्रसिद्ध झाली. आनंदपालच्या मृत्यूनंतर ती लॉरेन्स बिश्नोई टोळीत सामील झाली आणि २०२४ मध्ये गँगस्टर कला जठेदीशी लग्न केले. अपहरण, खंडणी आणि खून यासारख्या प्रकरणांमध्ये वॉन्टेड अनुराधाची कहाणी 'रिव्हॉल्व्हर राणी' या चित्रपटातून प्रेरित असल्याचे मानले जाते.

Comments
Add Comment

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील

Bengluru Blast: बेंगळुरूमध्ये स्फोट! १० वर्षीय मुलाचा मृत्यू , तर १२ जण जखमी

बेंगळुरू: शुक्रवारी बेंगळुरूमधील विल्सन गार्डनच्या चिन्मयनपाल्य भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एका १० वर्षीय