Jalgaon Crime: जळगाव हादरले! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ

शेजारच्या गावात सापडला मृतदेह, नरबळीच्या संशयाने खळबळ


जळगाव: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एका १३ वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत मुलाचा मृतदेह शेजारील गावच्या  शेतात फेकून देण्यात आला होता, ही घटना नरबळीसाठी तर घडवून आणली गेली नाही ना, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अखंड जळगाव यामुळे हादरलं आहे. पोलिसांनी सदर घटनेची तात्काळ नोंद करून पुढील तपासणीला सुरूवात केली आहे.


तेजस महाजन (वय १३) असं मृत मुलाचं नाव असून तो रिंगणगाव येथे राहणारा, तो काल म्हणजेच दिनांक १६ जूनपासून बेपत्ता झाला होता. तेजस अचानक दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोधाशोध सुरू केली होती, मात्र कुठेच त्याचा पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांनी शोध घेतला, मात्र त्याचा काहीही मागमूस लागला नाही. अखेर १७ जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ताबाबतची तक्रार दाखल करण्यात आली.


खर्ची गावाजवळील एका शेतात तेजसचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात तेजसच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले. सदर घटनेचा पोलीस विविध अंगाने तपास करत असून अद्याप हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.


Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.