यशस्वी जयस्वालकडे द्रविड, सेहवागच्या विक्रमाला मागे टाकण्याची संधी

लंडन : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांना मागे टाकण्याची त्याला या कसोटी मालिकेत नामी संधी मिळणार आहे.


२०२३ मध्ये त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद २००० धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे चालून आली आहे.


यशस्वी जायस्वालने सध्या १९ कसोटी सामन्यांमध्ये ३९ डावांमध्ये ५२.८८ च्या सरासरीने १७९८ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि दहा अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वी जायस्वालने या कसोटी मालिकेत पुढील तीन डावांमध्ये २००० धावांचा टप्पा पूर्ण केला


तर तो राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागला मागे टाकून भारतासाठी कसोटीत सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा भारतीय फंलदाज बनणार आहे. द्रविड आणि सेहवाग दोघांनीही ४० डावांमध्ये हा टप्पा गाठला आणि म्हणूनच इंग्लंडमधील आगामी मालिकेत जायस्वालसाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची ही एक नामी संधी आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत