VI Breaking News: वोडाफोन आयडीयाचे अस्तित्वच धोक्यात कंपनीकडे थकबाकी द्यायलाही पैसे नाहीत !

प्रतिनिधी: वोडाफोन आयडिया (VI) चे भविष्य धोक्यात आले आहे का? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या वोडाफोन आयडिया आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. यामुळे वोडाफोन आयडिया स्पेक्ट्रम वापर शुल्कावरील थकबाकी माफ न झाल्याने व्होडाफोन आयडिया (VI) ला टेलिकॉम ऑपरेटरच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल चिंता आहे. आर्थिक संकटात जात असल्याने सरकार वोडाफोन आयडियाला 'रिलीफ पॅकेज ' देण्याच्या तयारीत असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.


दिलेल्या वृत्तानुसार, सरकारचे म्हणणे आहे की, सरकारचा वीआयवर नियंत्रण करण्याचे लक्ष नाही. अँरियरच्या बदली ४९ टक्क्यांहून अधिक इक्विटी समभाग (Equity Shares) विकत घेण्याचा सरकारचा कुठलाही इरादा नाही असा संदेश सरकारने याप्रसंगी दिला आहे. सध्या सरकार वीआयची आर्थिक परिस्थिती टाळ्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत आहे. असे असले तरी वीआय २० वर्षातील थकित अँरियरच्या (Arrears) मधून पैसे देऊ शकेल का किंवा कंपनीच्या इतर उत्पन्न साधनातून पैसे देऊ शकतील का असे असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. अजून सरकारने यातील कुठलाही मार्ग अंतिम असल्याची पुष्टी दिलेली नाही. कंपनीच्या गेल्या काही वर्षांत कॅश फ्लो (Cash Flow) मध्ये होणारी घट पाहता कंपनीच्या आर्थिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.


याशिवाय सरकारने सांगितल्याप्रमाणे ' कंपनीकडे २०२८-२९ पर्यंतच पुरेशी कॅश फ्लो उपलब्ध आहे.' त्यानंतर जर पुरेसा निधी नसल्यास कंपनीला दैनंदिन कामाकरिताही संकटाला तोंड द्यावे लागू शकते.विशेष म्हणजे, व्होडाफोन आयडिया च्या सीईओ अक्षया मुंद्रा यांनी गेल्या महिन्यात दूरसंचार विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'भारत सरकारच्या (एजीआर) एजीआरवर वेळेवर पाठिंब्याशिवाय, व्हीआयएल आर्थिक वर्ष २६ नंतर काम करू शकणार नाही जर बँक निधीच्या चर्चा पुढे जाणार नाहीत'.डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (Department of Telecommunication) कडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ पर्यंत कंपनीला १८०६४ कोटींची थकबाकी देणी भरायची आहेत. मात्र जरी ती भर ली तरी पुढील वर्षापर्यंची देणी (Liability) देणे कंपनीला अशक्य आहे.


प्रसारमाध्यमांच्या रिपोर्टनुसार जरी कंपनीला थोडी सरकारने देणी माफ केली तरी आर्थिक वर्ष २०२७-२०२८ नंतर कंपनीकडे त्यापुढील पैसे भरण्यासाठी निधीची कमतरता असू शकते. जानेवारी ते मार्चपर्यंत कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला होता. कंपनीचा निव्वळ तोटा (Net Profit) हा ७१६६ कोटी इतका होता. यापूर्वी मे महिन्यात न्यायालयात देखील वीआयने याचिका दाखल करत भाष्य केले होते की, बँकेच्या निधी न मिळाल्यास येणाऱ्या आर्थिक वर्षात आम्ही ऑपरेट करू शकत नाही.

Comments
Add Comment

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :

Devendra Fadnavis : शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला https://prahaar.in/2026/08/04/old-monk-a-massive-blow-for-liquor-lovers-fssai-cracks-down-on-six-brands-including-old-monk-what-exactly-is-the-reason/ मुंबई :

Nashik Rain Update : अहिल्यानगरमध्ये ११२% पाऊस, तर नाशिकमध्ये....; नाशिक विभागातील जिल्ह्यांची स्थिती काय ?

Nashik Rain Update :गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने धुव्वादार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाले भरले

Nashik : जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेला अन् नको ते घडलं ! एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत

Nashik : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील शिवडी गावाजवळील पालखेड कालवा

Old Monk : मद्यप्रेमींना सर्वात मोठा धक्का! 'ओल्ड मंक'सह ६ ब्रँड्सवर FSSAI चा थेट दणका, नेमकं कारण काय?

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मद्य उद्योगातील नियमभंगाविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील

Mangalagaur 2026 : यंदा श्रावणात कधी साजरी होणार मंगळागौर ? जाणून घ्या पूजा पद्धत, ५ वर्षांची परंपरा आणि पौराणिक कथा!

मुंबई : श्रावण महिना उजाडला की महाराष्ट्रात महिलांना वेध लागतात ते म्हणजे अत्यंत उत्साहाच्या आणि मांगल्याच्या