Bomb Threat: मुंबईतील दोन नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी! शाळेच्या कॅम्पसची सुरक्षा वाढवली

मुंबईतील दोन नामांकित आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. 


मुंबई: मुंबईतील दोन नामांकित आंतरराष्ट्रीय शाळा, देवनारमधील कनकिया आणि कांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूल यांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांचे ईमेल आले आहेत. त्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यामध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या तपास यंत्रणा देखील या संदर्भात वेगाने कामाला लागल्या असून, यादरम्यान अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. मात्र, हे प्रकरण गांभीर्याने घेत, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


आजपासून राज्यातील सर्व शाळांना सुरुवात झाली असून, शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह विद्यार्थी आणि पालकांमध्ये पाहायला मिळाला. असे असताना, मुंबईतील दोन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असल्याची बातमी समोर आली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी शाळा प्रशासनाला धमकीचा ईमेल आला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही शाळांमध्ये पोहोचून चौकशी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ सदर ठिकाणी आढळले नाहीत.



कनकिया आणि रायन इंटरनॅशनल स्कूलला धमकीचे ईमेल


मुंबईतील देवनारमधील कनकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीतील समतानगर येथील रायन इंटरनॅशनल स्कूल यांना धमकीचे ईमेल आले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी देवनार आणि समतानगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. आरोपींची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक आणि सायबर तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी स्थानिक लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नये आणि काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.



शाळेच्या कॅम्पसची सुरक्षा वाढवण्यात आली


शाळा प्रशासनाने शिक्षक आणि मुलांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांच्या सहकार्याने शाळेच्या कॅम्पसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल. अशा धमक्या मिळाल्यानंतर मुलांचे पालकही चिंतेत आहेत. मुंबईतील बीकेसी येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाला अलिकडेच मिळालेल्या धमकीनंतर, आता शाळांना देण्यात आलेल्या या नवीन धमकीमुळे चिंता वाढली आहे.

Comments
Add Comment

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे

'जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण

शिवडीत सिलेंडर स्फोट, गुरुकृपा चाळीत अग्नितांडव; ५ ते ६ घरे जळून खाक

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण