Stock Market Update: सकाळी सेन्सेक्स १८४.७८ व निफ्टी ६६.५५ अंशाने उसळला बँक निफ्टीत दबाव कायम !

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क सकाळी वाढ झाली आहे. बाजारात सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) १८४.७८ अंशाने उसळला आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) ने ६६.५५ अंशाने उसळला आहे. सेन्से क्स  ८१३०३.३८ व निफ्टी २४७७६.३५ पातळीवर पोहोचली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३१.५५ अंशाने घसरण होत निर्देशांक ६२५३८.८९ पातळीवर व बँक निफ्टी ६९.१५ अंशाने घसरत ५५४२८.२५ पातळीवर पोहोचला होता. सेन्सेक्स मिडकॅप (Midcap) व स्मॉलकॅप (Smallcap) मध्ये अनुक्रमे ०.६२ व १.३० टक्क्याने घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण झाली. मिडकॅप ०.५२ व स्मॉलकॅप ०.९७% घसरला आहे.

आज बाजारातील सेन्सेक्स व निफ्टीची पातळी वाढली असली तरी बँक निर्देशांकात गेल्या आठवड्यातील घसरण कायम राहिली आहे. बाजारातील दबावाची पातळी विशेषतः बँक निर्देशांकात दिसून येते. एकूण बाजारातील निर्देशांकात तेजी दिसली तरी मात्र बँकेशिवाय मिडकॅप व स्मॉलकॅपवरचा दबाव जाणवत आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये केवळ एफएमसीजी (०.०२%), आयटी (०.३५%) निर्देशांकात वाढ झाली आहे बाकी सगळ्या निर्देशांकात सकाळी घसरण कायम राहिली आहे. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.९७%), मिडिया (०.७२%), रिअल्टी (०.७३%), मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्विसेस (०.८१%) समभागात (Shares) मध्ये घसरण झाली आहे.

काल इस्त्राईलने पुन्हा इराकवर क्षेपणास्त्र डागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील अर्थविश्वात दबावाचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसात कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात सतत वाढ होत असताना त्याचा फटका आशियाई बाजारा त बसला आहे. गेल्या तीन दिवसात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) विशेषतः शुक्रवारी १५१९६.६१ कोटींची गुंतवणूक बाजारातून काढून घेतल्यावर बाजारातील सपोर्ट लेवलला फटका बसला हो ता. मात्र घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (Domestic Institutional Investors DII) ने २९०६.१३ कोटींची अधिकची गुंतवणूक केल्याने निफ्टीची पातळी मर्यादित राहिली.

याशिवाय या आठवड्यात भारतातील किरकोळ महागाई दर (Retail Inflation) चे दर येणे अपेक्षित असल्याने बाजारात काही प्रमाणात तेजीचे वातावरण असू शकते.  मात्र मिडकॅप व स्मॉलकॅपवरचा दबाव बँक व फायनांशियल सर्विसेस समभागात दिसून आल्याने त्यांची परिणती कशी होते ते अखेरच्या सत्रात कळू शकेल.

सकाळच्या सत्रात नावा (६.७९%), पीआय इंडस्ट्रीज (३.४७%), ग्लॅन्ड फार्मा (२.२७%), एससीआय (२.१७%), एचबीएल इंजिनियरिंग (१.८९%), केईसी इंटरनॅशनल (१.७९%), सिप्ला (१.५४%),पॉवर ग्रीड (१.४६%), भारती एअरटेल (१.० ५%), अल्ट्राटेक सिमेंट (०.९३%), श्रीराम फायनान्स (०.७९%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.७०%) समभागात वाढ झाली आहे.

इंटलेक डिझाईन (३.९४%), किर्लोस्कर ऑईल (३.६२%), टाटा टेलि कम्युनिकेशन (३.५६%), जेएम फायनांशियल (३.२४%), एमएमटीसी (३.०९%), आयएफसीआय (२.९२%), अलोक इंडस्ट्रीज (२.८७%), टाटा मोटर्स (४.७९%), बजाज होर्डिंग्ज (२.६४%), अदानी पॉवर (२.२४%), अदानी ग्रीन एनर्जी (१.८१%), आयआरएफसी (१.३५%) या समभागात घसरण झाली आहे.
Comments
Add Comment

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

मेट्रो १' तात्पुरती विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा मेट्रो- १' सेवा तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विस्कळीत

बॅगच्या अस्तरमध्ये लपवले होते ८७ लाख; दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक!

मुंबई कस्टम्सची मोठी कारवाई; विदेशी चलनाचा मोठा साठा जप्त मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी