Stock Market Analysis: ' प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बँक निर्देशांकाचे कमबॅक! सेन्सेक्स ६७७.५५ व निफ्टी २२७.९० अंशाने उसळला 'ही' कारणे वाढीस पूरक !

मोहित सोमण : आज अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex), निफ्टी ५० (Nifty 50) 'हिरव्या' रंगात स्थिरावला आहे. सेन्सेक्स ६७७.५५ अंशाने वाढत ८१७९६.१५ पातळी वर तर निफ्टीत २२७.९० अंशाने वाढ होत निर्देशांक २४९४६.५० पातळीवर पोहोचला आहे. आज शेअर बाजारात विशेषतः कंसोलिडेशनची (Consolidation) फेज दिसली आहे. बँक निर्देशांकाने पुन्हा वापसी (Rebound) केली आहे. का ही काळानंतर आज अखेरीस सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३९९.०० अंशाने वाढ होत निर्देशांक ६२९६९.४४ पातळीवर गेला आहे. तर बँक निफ्टी तब्बल ४१७.५५ अंशाने वाढत ५५९४४.९० पातळीवर पोहोचला आहे.


आज बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९३%, ०.३८% वाढ झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९३%, ०.९५% वाढ झाली आहे. विशेषतः बँक निर्देशांकाबरोबरच मिडकॅपमध्ये बळ मिळाल्याने फायनां शि यल सर्विसेस समभागांनीही चांगली कामगिरी केली आहे.


आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ सकाळप्रमाणेच आयटी (१.५७%), तेव व गॅस (१.११%), रिअल्टी (१.३२%), मिडस्मॉलकॅप आयटी व टेलिकॉम (१.६८%), मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्विसेस (०.८६%) समभागात वाढ झाली आहे. जवळपास सगळ्याच निर्देशांकात वाढ झाली आहे. विशेषतः अस्थिरता निर्देशांक (VIX) निर्देशांकात १.६०% एवढी घट झाल्याने बाजारातील जवळपास ०.५० ते १ % वाढ झाली आहे.


आज आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव पातळी कायम असताना भारतीय बाजाराने त्यावर मात केली आहे. इस्त्राईलने काल पुन्हा एकदा इराणवर क्षेपणास्त्र डागल्याने बाजारात कच्च्या (Crude) तेलाचा निर्देशांकात वाढ झाली होती. गेल्या आठवड्यातील ८.५० टक्के पातळीवर कच्चे तेल पोहोचले होते. आज मात्र बाजारातील मागणीत घट झाल्याने सोने व तेल दोन्हीमध्ये घट झाली आहे. याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपयाची सकाळपर्यंत सहा पैशाने घट झाल्यानंतर डॉलरची पातळी वाढली होती. परिणामी काही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे घरगुती किरकोळ गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने बाजारात सपोर्ट लेवल राखण्यास बाजाराला यश आले आहे.


याशिवाय आज दुपारी घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index) अधिकृत आकडेवारी समोर आली आहे त्यातील माहितीनुसार, मे महिन्यात १४ महिन्यातील सर्वाधिक घसरण महागाईत झाली असून मे महिन्यात ०.३९% WPI मध्ये घट झाली आहे. याचीही सकारात्मकता बाजारात राहिली. याशिवाय अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल अशी फूस बाजारात असल्याने उसळीला खतपाणी मिळाले. याशिवाय अमेरिका इराण शाब्दिक चकमकीनंतरही डाऊ जोन्स फ्युचर (Dow Jones Future) बाजारात १५८.९९ अंशाची वाढ झाल्याने बाजारात उसळीची वातावरण निर्मिती झाली. याखेरीज एस अँड पी ५००, नासडाक (NASDAQ) मध्ये मात्र घसरण झाली होती. युरोपि यन बाजारातही तेजी पाहायला मिळाली. आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) हा १.०२%, निकेयी २२५ (Nikkei 225) हा १.२५%, हेगंसेंग (०.७०%), शांघाय कंपोझिट (०.३५%) वाढला होता.


निफ्टी पॅकमध्ये, ५० पैकी ४६ समभाग 'हिरव्या' रंगात बंद झाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी या तेजीत सर्वाधिक योगदान दिले.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना अशिका इन्स्टीट्यूशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले, 'जागतिक गोंधळाला बाजारांनी आव्हान दिले.भू-राजकीय तणाव असूनही निफ्टी मजबूत बंद झाला. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक अनिश्चितता वाढत असतानाही, भारतीय बाजार लवचिक राहिले. इराणवर इस्रायली लष्करी हल्ल्यांमुळे तेल पुरवठा आणि प्रादेशिक स्थिरतेतील संभाव्य व्यत्ययाबद्दल चिंता व्यक्त झाल्याने भू-राज कीय परिदृश्याने तीव्र वळण घेतले, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदार अस्वस्थ झाले. तरीही, देशांतर्गत बाजाराची सुरुवात थोडीशी सकारात्मक झाली आणि निफ्टी २४,७३२ पासून सुरू झाला. २४,७०३ च्या इंट्रा-डे निचांकी पातळीवर काही काळ घसरल्यानंतर, निर्देशांकाने जोरदार पुनरागमन केले आणि २४,९६७ च्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला. क्षेत्रीय कामगिरी मोठ्या प्रमाणात सकारात्मक होती, आयटी, रिअल्टी, धातू आणि तेल आणि वायू या प्रमुख निर्देशांकांसह तेजीला चालना मिळाली. जवळजवळ सर्व क्षेत्रे हिरव्या रंगात बंद झाली, ज्यामुळे बाजार-व्यापी ताकद अधोरेखित झाली. स्टॉक-विशिष्ट आघाडीवर, टाटा मोटर्सची युके-आधारित उपकंपनी, जग्वार लँड रोव्हर (JLR) ने आर्थिक वर्ष २५ मध्ये चीन च्या प्रीमियम कार सेगमेंटमध्ये वाढत्या दबावाचे संकेत दिल्यानंतर ५% ची तीव्र घसरण झाली (जरी चीन जागतिक स्तरावर सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजार असला तरी) डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये, मार्केट ब्रेथ मजबूत राहिली, १९५ स्टॉक्स ने वाढ केली तर ३० स्टॉक्सने घसरण केली. एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, श्री सिमेंट, पीआय इंडस्ट्रीज आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज सारख्या स्टॉक्समध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्ड-अप दिसून आले—यामुळे व्यापारी क्रियाकलाप आणि रस वाढला आहे.'


आज शेअर बाजारात सर्वाधिक वाढ इंद्रप्रस्थ गॅस (६.७४%), न्यूजेन सॉफ्टवेअर (६.०५%), गॅलॅक्सी सरफॅक्ट (६.२४%), शिला फोम (५.७७%), सुप्रीम इंडस्ट्रीज (४.६९%), आनंद राठी वेल्थ (४.४६%), इंडियन हॉटेल्स (२.६९%), भारत इले क्ट्रॉनिक (२.४५%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (२.४३%), अल्ट्राटेक सिमेंट (२.४१%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (२.३५%), इंटरग्लोब एव्हिएशन (२.२९%), युनायटेड स्पिरीट (२.२२%), टेक महिंद्रा (२.१०%) या समभागात वाढ झाली आहे.


तर सर्वाधिक घसरण हस्तून अँग्रो (३.७४%), वलोर इस्टेट (३.०५%), टाटा मोटर्स (३.५७%), अलेंबिक फार्मा (२.९७%), त्रिवेणी इंजिनियरिंग (२.०३%), (सीसीएल प्रोडक्ट (CCL Product) (२.७२%),अदानी पॉवर (१.३९%), डॉ रेड्डीज (१.१५%), बजाज होल्डिंगज अँड इनव्हेसमेंट (०.७५%), मदर्सन (०.५४%), पिडीलाईट इंडस्ट्रीज (०.४५%), अदानी पोर्टस (०.३१%), कॅनरा बँक (०.२०%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (०.१७%), होडांई इंडिया (०.१०%) या समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

हिंदू पत्नीबद्दलच्या वक्तव्यामुळे व्हान्स यांच्यावर हिंदुफोबिक असल्याची टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात सध्या

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

टेनिसपटू रोहन बोपण्णाची टेनिसमधून निवृत्ती

मुंबई : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तो पहिल्यांदाच