plane crash: कोणत्या देशात होतात सर्वाधिक विमान अपघात, आकडा पाहून व्हाल हैराण

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्यांनाच हादरवून टाकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर जे व्हिडिओ समोर आले ते हैराण कऱणारे होते. या दुर्घटनेतील मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कारही झाले नाही तोच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.


या घटनेवरून तुम्हाला वाटत असेल की भारतात हे अपघात सर्वाधिक होत असावेत. मात्र जगात असा एक देश आहे जिथे सर्वाधिक विमान अपघात झाले आहेत.


अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश होण्याआधी १० वर्षांपूर्वी सर्वात मोठा विमान अपघात २०२०मध्ये झाला होता. या दरम्यान फ्लाईट दुबईवरून परतत होती आणि केरळमध्ये पाऊस होत असल्याने विमान रनवेवर घसरून त्याचे दोन तुकडे झाले होते. यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात १९० लोक प्रवास करत होते.



सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात झाले?


सर्वाधिक विमान अपघातांबाबत बोलायचे झाल्यास यात अमेरिका अव्वल स्थानावर आहे. येथे सर्वाधिक विमान अपघात होतात. एका रिपोर्टनुसार १९४५ ते २०२२ या दरम्यान गेल्या ७७ वर्षांत अमेरिकेत एकूण ८६४ विमान अपघात झाले आहेत. याच्या हिशेबाने दरवर्षी येथे ११ ते १२ अपघात अमेरिकेत होतात. यात दुसऱ्या स्थानावर रशिया हा देश आहे. येथे एकूण अपघातांची संख्या ५३९ आहे. यानंतर कॅनडा १९१ आणि ब्राझील १९० अपघात झालेत. कोलंबिया पाचव्या स्थानावरून असून तेथे १८४ अपघात झालेत.



आशियामध्ये विमान अपघातात टॉपमध्ये हे देश


सर्वाधिक विमान अपघातांच्या यादीत भारत १०व्या स्थानावर आहे. भारतात गेल्या ७७ वर्षात ९५ विमान अपघात झालेत. भारतानंतर चीनचा नंबर लागतो. चीनमध्ये ७६ विमान अपघाताच्या घटना घडल्यात.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर