बापरे! चालत्या बसचं टायरच आलं बाहेर, थोडक्यात बचावले प्रवासी

  59

बोरिवली-मुरुड एसटी बसचं टायर धावत्या बसमधून आलं बाहेर 


महाड : सध्या ठीकठीकाणांहून अपघाताच्या बातम्याच जास्त ऐकायला मिळत आहेत. मुंब्रा दिवा रेल्वे दुर्घटना, अहमदाबाद विमान अपघात, केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅश त्यानंतर कुंडमळा ब्रिज दुर्घटना असे एकामागून एक अपघातांच्या घटना घडून गेल्यामुळे, या सर्व घटनेमुळे प्रत्येकांच्या मनात एक अनाहूत भीती बसली आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोरिवली-मुरुड एसटी बसचा होणारा मोठा  अपघात होता होता वाचला.  बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला, अन्यथा मोठा अनर्थच घडला असता.


महाड तालुक्यात महाड-दापोली रोडवर एसटी महामंडळाच्या बसेसचा निसरड्या रस्त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. असं असताना आज मुरुड तालुक्यात बोरिवली वरून मुरुडला येणारी एम एच २०. बी एल. ३८०८ या क्रमांकाची बस विहुर गावाजवळ आली. यावेळी चालत्या गाडीमधून बसच्या उजव्या बाजूचे मागील दोन्ही टायर बाहेर आले. मात्र ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात होता होता वाचला.



आता पावसाळा चालू झाला आहे. त्यातच शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज शाळा महाविद्यालयात ये-जा करणार असल्याने जर चालत्या बसमध्ये असा अपघात झाल्यास याला कोण जबाबदार, असा सवाल एसटी महामंडळातून प्रवास करणारे जिल्ह्यातील असंख्य प्रवासी सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत.

Comments
Add Comment

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी